Home | Gossip | Sapna Haryanvi Songs Beta Ye Tumse Na Ho Payega

मुलाला खुर्चीमध्ये बांधले, मारल्या चापटा आणि म्हणाली सपना चौधरी- 'तू मला सहन करू शकणार नाहीस', व्हिडीओ होत आहे व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 14, 2019, 12:12 PM IST

'बेटा तुला जमणार नाही' मध्ये सपना चौधरीने दाखवल्या बॉलिवूड अडा... 

  • Sapna Haryanvi Songs Beta Ye Tumse Na Ho Payega

    मुंबई : सपना चौधरीचा नवा व्हिडीओ शुक्रवारी रिलीज केला गेला. हा एक हिंदी डान्स व्हिडीओ आहे, ज्यामध्ये सपना कॉलेज गर्लच्या रोलमध्ये दिसत आहे. यामध्ये ती तिला छेडणाऱ्या मुलांना धमकावत आहे. गाण्याची सुरुवात अशी आहे, 'जब भी मैं रूठूंगी तो तू व्हाट्सऐप करेगा, आए न रिप्लाय तो रिक्वेस्ट करेगा...ये नखरे मेरे नॉटी-नॉटी...ऊपर से ड्रेस छोटी-छोटी...मुझे तू सह न पाएगा...बेटा ये तुमसे न हो पाएगा.' एका सीनमध्ये ती को-अॅक्टरला बांधून चापट मारतानाही दिसत आहे.

    गाण्यामध्ये बॉलिवूडमधील अदा दाखवत आहे सपना...
    नेहमी आपल्या हरियाणवी स्टाईलची ओळखली जाणारी सपना या गाण्यामध्ये बॉलिवूडमधील अदा दाखवत आहे. हरियाणवी हिट्स नावाच्या यू-ट्यूब चॅनलने हे गाणे रिलीज केले आहे. याला आवाज मोनिका अग्रवाल आणि राजू पंजाबीने दिला आहे. सपना यापूर्वी दोन बॉलिवूड फिल्म 'वीरे की वेडिंग' आणि 'नानू की जानू' मध्ये आयटम नंबर केला आहे. याव्यतिरिक्त तिने 'दोस्ती के साइड इफ़ेक्ट' मध्ये लीड रोलही केला आहे.

Trending