आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊ इब्राहिमला शर्टलस पाहून साराने दिले फनी एक्सप्रेशन, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः ख्रिसमसच्या निमित्ताने सारा अली खानने एक फोटोशूट केले असून त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोशूटची खास गोष्ट म्हणजे त्यात सारा तिचा भाऊ इब्राहिम अली खानसोबत दिसली आहे. फोटोशूटमध्ये दोघांची बेस्ट बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. साराने कधी फनी एक्सप्रेशन देताना तर कधी इब्राहिमला जीभ दाखवून त्याला चिडवतानाची छायाचित्रे क्लिक केली आहेत. काही छायाचित्रांमध्ये इब्राहिम शर्टलेस दिसत आहे आणि यामध्ये साराचे मजेदार एक्सप्रेशनदेखीलआहेत.

सारा 'कुली नंबर 1' च्या रिमेकमध्ये दिसणार आहे वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे सारा लवकरच डेव्हिड धवनच्या आगामी 'कुली नंबर 1' या चित्रपटाच्या रीमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासह वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल'च्या रीमेकमध्ये सारादिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन साराचा सहकलाकार असेल. 2020 मध्ये दोन्ही चित्रपट प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. 24वर्षीय साराने 2018 मध्ये 'केदारनाथ' चित्रपटातून पदार्पण केले होते, यासाठी तिला अनेक  अवॉर्ड फंक्शनमध्ये पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.