आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचे झाले ब्रेकअप ? जाणून घ्या काय आहे कारण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. अशातच साराचे पिता सैफ अली खानने कार्तिक आर्यन एक चांगला मुलगा असल्याचे म्हणत साराला सपोर्ट केला होता. पण आता बातमी येत आहे की, सारा आणि कार्तिक यांचे ब्रेकअप झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन कोणत्याही पर्सनल कारणासाठी नाही तर प्रोफेशनल कारणामुळे वेगळे झाले आहेत. हे दोघेही आपल्या कामात एवढे व्यस्त झाले आहेत की, एकमेकांसाठी वेळ काढू शकत नाहीयेत. 

रिपोर्ट्सनुसार, चित्रपट 'लव आजकल 2' चे शूटिंग संपल्यानंतर सारा आणि कार्तिक एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कार्तिक 'पती पत्नी और वो' नंतर 'दोस्ताना 2' च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे तर सारा 'कुली नंबर 1' चे शूटिंग करत आहे. शूटिंगमध्ये सतत व्यस्त दोघेही आता एकमेकांना अजिबात वेळ देऊ शकत नाहीयेत. त्यामुळेच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आता दोघेही आपापल्या प्रोफेशनल लाइफवर लक्ष देऊ इच्छितात. 

बातम्या आणखी आहेत...