आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sara Ali Khan And Kartik Aryan Gets Emotional At Last Day Of Shooting , Sara Said, 'I Will Miss You A Lot, Kartik'

इम्तियाजच्या 'लव्ह आज कल'च्या सिक्वलचे शूटिंग झाले पूर्ण, अखेरच्यावेळी इमोशनल झाले सारा आणि कार्तिक, साराने लिहिले - 'मी तुला खूप मिस करेन कार्तिक'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. मात्र याचे कोणतेही नाव अद्याप ठरलेले नाही पण हा चित्रपट 'लव्ह आज कल' चा सीक्वल मानला जात आहे. इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या या चित्रपटाचे फाइनल शेड्यूल हिमाचलमध्ये होते. यापूर्वी सलग 66 दिवस चित्रपटाचे शूटिंग राजस्थान, दिल्ली आणि मुंबईतदेखील झाले होते.  

 

 

साराने लिहिले स्वप्न झाले पूर्ण... 
कॉफी विद करण शोमध्ये वडील सैफ अली खानसोबत पोहोचलेल्या साराने कार्तिक आर्यन आपला क्रश असल्याचे सांगितले होते. साराला जेव्हा विचारले गेले की, तिला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याला डेट करायला आवडेल तेव्हा तिने कार्तिक आर्यनचे नाव घेतले होते. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर साराने इंस्टाग्रामवर फोटो आणि मेमोरीज शेअर करून लिहिले, 'इम्तियाजने तिचे स्वप्न पूर्ण केले.'  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

It's a WRAP!! 66 days & a million memories ❤️🌈 Thank you @imtiazaliofficial for making my dream come true🤗🤩 I truly appreciate your warmth, patience and consideration with me every single day. Being on your set has been a privilege that I will always cherish and already miss🙏🏼 🎈 Thank you @kartikaaryan for instantly making me comfortable with you, for selflessly giving and for consistently looking out for me. From coffee’s about you to chai’s with you, I wish we could do it all over again ☕️ 🧿💓 I’m going to miss you more than you know and more than I can admit 🤭🤦🏻‍♀️ Imtiaz Ali’s next with @kartikaaryan and @randeephooda. ‬ ‪Releasing on 14th Feb 2020. Presented by @officialjiocinema , #DineshVijan’s @maddockfilms , @imtiazaliofficial & @reliance.entertainment @wearewsf

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

 

इम्तियाजला आलिंगन देऊन रडला कार्तिक आर्यन... 
अभिनेता शूटच्या शेअवतच्या दिवशी खूपच इमोशनल झालेला दिसला. सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये एका मंदिरासमोर उभा असलेला अभिनेता कार्तिक आर्यन, इम्तियाज अलीला आलिंगन देताना दिसत आहे. तअसेच यादरम्यान तो इमोशनल होऊन रडूही लागला.  

 

रणवीर सिंहने केली मजेदार कमेंट…
सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या या रोमँटिक फोटोजवर रणवीर सिंहने कमेंट केले. ‘खूप गोड दिसत आहात, विसरू नका सर्वात आधी कुणी भेट करून दिली होती.’ मुंबईमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये सारा आणि कार्तिक दोघेही होते, पण एकमेकांशी बोलू शकत नव्हते. योगायोगाने रणवीर सिंहदेखील तिथे हजर होता आणि त्याला साराच्या क्रशबद्दल माहित होते. मग काय, थोडाही विलंब न करता रणवीरने त्या दोघांची भेट घडवून आणली होती. 

 

व्हॅलेन्टाईन डेला रिलीज होणार आहे चित्रपट... 
चित्रपटाच्या शूटिंगशी निगडित मेमोरीजनंतर साराने चित्रपटाची रिलीज डेटदेखील सांगितली. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2020 ला रिलीज होईल. चित्रपटात रणदीप हुड्‌डादेखील दिसणार आहे.