आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Kedarnath Teaser: पहिल्याच चित्रपटात लीपलॉक करताना दिसली सैफ अली खानची लेक, टीजरमध्ये बघा सारा-सुशांतची केमिस्ट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्या बहुप्रतिक्षित 'केदारनाथ' या आगामी चित्रपटाचा टीजर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटातून सैफ अली खान आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंग यांची लेक सारा अली खान चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत सारा या चित्रपटात झळकत आहे. 


या चित्रपटाला उत्तराखंड येथे 2013मध्ये आलेला महापूराची पार्श्वभूमी आहे.  यासोबतच सारा आणि सुशांत यांची प्रेमकथाही बघायला मिळतेय. टीजरमध्ये सुशांत आणि सारा यांचा लीपलॉक सीनही आहे. हा सिनेमा 7 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अभिषेक कपूरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...