आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेक साराच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये विना मेकअप स्पॉट झाली आई अमृता सिंह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान 25 वर्षांची झाली आहे(12 ऑगस्ट). डिझायनर संदीप खोसलाच्या घरी रविवारी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनमध्ये आई अमृताही सहभागी झाली. अमृता पार्टीमध्ये विना मेकअप स्पॉट झाली. अमृता यांनी डार्क ग्रे कलरचा सूट घातला होता. साराचा लहान भाऊ इब्राहिम अली खानही बहिणीच्या बर्थडेपार्टीमध्ये दिसला. पार्टीमध्ये सारा आणि इब्राहिम एकाच कारमधून पोहोचले.
या सेलेब्सनेही एन्जॉय केली पार्टी 


- लेक साराच्या बर्थडेमध्ये वडील सैफ दिसला नाही. तर तिची सावत्र आई करीना कपूरही सेलिब्रेशनमध्ये दिसली नाही. 
- साराने 'केदारनाथ'च्या स्टार्ससोबतही बर्थडे सेलिब्रेट केला. सारा याच चित्रपटातून आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अॅक्टर सुशांत सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'केदारनाथ' व्यतिरिक्त सारा डायरेक्टर रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंहसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 
- साराचा जन्म 12 ऑगस्ट, 1993 मध्ये झाला होता. साराने कोलंबिया यूनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पुर्ण केले आहे. आई-वडिलांप्रमाणे सारालाही बॉलिवूडमध्ये करिअर बनवायचे आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...
 

 

बातम्या आणखी आहेत...