आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनूसोबत चेहरा लपवत ईद साजरी करण्यासाठी निघाली होती सारा अली खानने, आता फोटो होत आहे व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कार्तिकने ईदच्या निमित्ताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत कार्तिक आणि सारा अली खान दोघेही आपला चेहरा लपवत ईद साजरी करत आहे. सोशल मीडियावर या दोघांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांचे चाहते देखील या फोटोवर कमेंट्स करत आहेत. सध्या कार्तिक आणि सारा यांना सोबत पाहिले जात आहे. दोघेही 'लव आज कल 2' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. कार्तिकने आर्यने 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटात सोनूची भूमिका पार पाडली होती. 

 

करन जोहरच्या टॉक शोमध्ये केला खुलासा
सारा अली खानने करन जोहरच्या टॉक शोमध्ये कार्तिक तिचा क्रश असल्याचा खुलासा केला होता. तेव्हापासून ही जोडी चर्चेत आली होती. यामुळे दोघांच्या चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह वाढला आहे.  चाहत्यांना दोघांना सोबत काम करताना पाहण्याची इच्छा आहे. कार्तिक आणि सारा आपल्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करत लवकरच एका चित्रपटात दिसणार आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Eid Mubarak 💫

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

 

इम्तियाज अली यांच्या या चित्रपटात दिसणार सारा आणि कार्तिक

कार्तिक आर्यनने इंस्टाग्रामवर फोटोसोबत कॅप्शनमध्ये 'ईद मुबारक' लिहित लोकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान इम्तियाज अली यांच्या 'लव आज कल 2' या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे.