आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारा अली खानने बेस्ट फ्रेंड काम्याबरोबर साजरा केला ख्रिसमस, फोटो झाले व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री सारा अली खानने तिच्या इंस्टाग्रामवर बेस्ट फ्रेंड काम्या अरोराबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ख्रिसमस वेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. या फोटोमध्ये साराचा सिझलिंग हॉट लूक दिसत आहे. साराने समुद्रकिनार्‍यावर होणार्‍या सनराईजचे दृश्य तिच्या इंस्टा स्टोरीवरही शेअर केले आहे.

  • या चित्रपटांमध्ये झळकणार सारा...

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे सारा लवकरच डेव्हिड धवनच्या आगामी 'कुली नंबर 1' या चित्रपटाच्या रीमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासह वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल'च्या रीमेकमध्ये सारादिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन साराचा सहकलाकार असेल. 2020 मध्ये दोन्ही चित्रपट प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. 24वर्षीय साराने 2018 मध्ये 'केदारनाथ' चित्रपटातून पदार्पण केले होते, यासाठी तिला अनेक  अवॉर्ड फंक्शनमध्ये पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.