आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिम्बा'ला मिळालेल्या धमाकेदार ओपनिंगने आनंदी झालेल्या सारा अली खानने मंदिराबाहेर वाटली मिठाई, मुलांसोबत काढले फोटो, चाहत्यांसोबत क्लिक केले सेल्फी : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. रणवीर सिंह आणि सारा अली खानच्या 'सिम्बा' चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास 22 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या चांगल्या रिस्पॉन्समुळे आनंदी झाल्यानंतर साराने मुक्तेश्वर मंदिरात जाऊन लोकांना मिठाईचे पॉकेट वाटले. या निमित्ताने साराने व्हाइट सलवार सूट परिधान केला होता. 

 

चाहत्यांसोबत क्लिक केले फोटोज 
- सारा मंदिरातून बाहेर येताच चाहत्यांनी तिला घेरले. साराने कुणालाही निराश केले नाही. तिने मुलांसोबत फोटो काढले आणि चाहत्यांसोबत सेल्फीही क्लिक केला. 
- सारासोबत आई अमृता सिंहही मंदिरात आली होती. ती गाडीमध्येच बसलेली राहिली. 
- साराने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाच्या रिलीजपुर्वी साराने मंदिरात जाऊन गरीबांना मिठाई वाटली होती. 
- रोहित शेट्टीच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानमध्ये सारा अली खान, रणवीर सिंह, सोनू सूद, आशुतोष राणा आणि सिध्दार्थ जाधवची प्रमुख भूमिका आहे. चित्रपटात अक्षय कुमारने कॅमिओ केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...