आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. सारा अली खान(25)चे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये साराने आपल्या 2 वर्षांचा भाऊ तैमूरला कडेवर घेतले आहे. सारा या पुर्ण इव्हेंटमध्ये तैमूरला कडेवर खेळवताना दिसतेय. पण हा तैमूर नाही तर त्याच्यासारखी दिसणार डॉल आहे. ही डॉल घेऊन सारा आपल्या आगामी चित्रपट 'केदारनाथ'चे प्रमोशन करतेय. 7 डिसेंबरला 'केदारनाथ' हा चित्रपट रिलीज होतोय. साराने चित्रपटाचे प्रमोशन करणे सुरु केले आहे. सारा आपला को-स्टार सुशांत सिंह राजपूतसोबत सिंगिंग रियलिटी शो 'सा रे गा मा पा'च्या सेटवर पोहोचली. सारा स्वतः आपल्या हातात तैमूरची डॉलर घेऊन पोहोचली होती. सैफ अली खानने स्वतः मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, अनेक प्रोड्यूसर-डायरेक्टरला प्रमोशनसाठी तैमूरचा वापर करण्याची इच्छा होती. पण सर्वप्रथम ही संधी साराली मिळाली. तैमूरच्या डॉल सोबत का असेना पण ही संधी साराला मिळाली. 'केदारनाथ' चित्रपट अनेक वेळा वादात अडकला, पण अखेर हा चित्रपट रिलीज होणार आहे. यानंतर सारा लवकरच दूसरा चित्रपट 'सिम्बा'मध्ये रणवीर सिंहसोबत दिसणार आहे.
साराला या नावाने हाक मारतो तैमूर
- सारा काही दिवसांपुर्वी 'केदारनाथ'चे प्रमोशन करण्यासाठी रेडियो स्टेशनवर पोहोचली होती. येथे साराने चित्रपटाचे प्रमोशन केले, यासोबतच तिचा लहान भाऊ तैमूर तिला कोणत्या नावाने हाक मारतो हेसुध्दा तिने सांगितले.
- साराने सांगिगतेल की, तैमूर करीनाला अम्मा, सैफला अब्बा, इब्राहिमला(साराचा भाऊ) भाई आणि तिला पाहताच 'गोल' म्हणतो. सारा म्हणाली की, तैमूर मला या नावाने का हाक मारतो हेच मला कळत नाही.
करीनाला K म्हणते सारा
- 'कॉफी विद करण' मध्ये सारा सैफसोबत आली होती. यावेळी तिने सांगितले की, करीनासोबत तिची चांगली बॉन्डिंग आहे. करीना आणि सारामध्ये केवळ 13 वर्षांचे अंतर आहे.
- साराने सांगितले की, ती करीनाला फक्त करीना किंवा K या नावाने हाक मारते. करीना तिला म्हणते की, तुझ्याजवळ खुप चांगली आई आहे. यामुळे तु माझी फक्त एक मैत्रिण म्हणून राहा.
सारा आणि करीनाची आहे स्ट्राँग बॉन्डिंग
- करीनाने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, दोन्ही मुलं सारा आणि इब्राहिमसोबत माझी स्पेशल आणि स्ट्राँग बॉन्डिंग आहे. मी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी त्यांची मदत करते.
- करीना म्हणाली होती की, "आम्ही मित्रांप्रमाणे राहतो. कारण त्यांना अमृताच्या रुपात खुप चांगली आई मिळाली आहे. त्यांनी मुलांचे संगोपन खुप चांगल्या पध्दतीने केले आहे."
- सारा ही सैफ आणि करीनाच्या लग्नात सहभागी झाली होती. सारा आणि इब्राहिम नेहमीच करीनासोबत पार्टी करताना दिसतात.
View this post on InstagramA post shared by Sushant Singh Rajput FC (@sushantsinghrajput_fan_forever) on Nov 26, 2018 at 11:03pm PST
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.