आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sara Ali Khan Gets Emotional Because Her Film 'Kedarnath' Completed One Year, Writes Emotional Note For Team

'केदारनाथ' चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले तर भावुक झाली सारा अली खान, टीमसाठी लिहिली इमोशनल नोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आपल्या पहिल्या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याने सारा अली खान भावुक झाली. तिने इंस्टाग्रामवर सेटचे फोटो शेअर करून मुख्य अभिनेता सुशांत राजपूत यांच्यासह संपूर्ण टीमला धन्यवाद म्हणाली आहे. सोबतच तिने एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे इंडस्ट्रीचेही आभार मानले. सध्या ती आपला आगामी चित्रपट 'कुली नं 1' साठी वरुण धवनसोबत शूट करत आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी 1 मेला कामगार दिवसाच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त ती कार्तिक आर्यनसोबत इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटातही दिसणार आहे. 

तिने चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि रायटर कनिका ढिल्लन यांना धन्यवाद म्हणत लिहिले, 'मला मुक्कुला भेटवल्याबद्दल धन्यवाद.' साराने चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. सुशांत सिंह राजपूतबद्दल तिने लिहिले की, मी या गोष्टीचे कौतुक करेन की, या प्रवासादरम्यान तू माझी खूप मदत केलीस आणि साथ दिली.' तिने चित्रपटाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर जेहान हांडा यांचेही आभार मानले.  सारा आणि सुशांत यांच्या अफेयरच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. दोघे अनेकदा सार्वजनिक जागांवर सोबत दिसले होते. नोटच्या शेवटी तिने लिहिले, 'जय भोलेनाथ' आणि इंडस्ट्रीमध्ये एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सर्वांचे आभार मानले.