आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'केदारनाथ'ची कथा ऐकल्यानंतर माझ्या आणि आईच्या डोळ्यात आले होते पाणी - सारा अली खान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. सारा अली खान दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्या 'केदारनाथमधून पदार्पण करत आहे. पुढील महिन्यात दोन आठवड्यांच्या अंतराने तिचे दोन चित्रपट 'केदारनाथ' आणि 'सिंबा' रिलीज होणार आहेत. सारा म्हणते, दोन चित्रपट एकाच वेळी रिलीज होण्याचा दबाव आहे. लोक म्हणतात, कलाकारांच्या मुलांसाठी काम करणे सोपे असते. काही अंशी हे खरंदेखील आहे. कारण मला करिअरच्या सुरुवातीलाच अभिषेक कपूर आणि रोहित शेट्टीसारखे मोठे दिग्दर्शक मिळाले. पण प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि नुकसान असते, असे मला वाटते. 

 

म्हणून चित्रपट करण्याचा निर्णय घेतला 
- साराला 'केदारनाथ' मध्ये घेण्याआधी अभिषेकने दोघांचा सामान्य मित्र संदीप खोसलाशी चर्चा केली होती. सारा म्हणते, 'मी आणि आईने जेव्हा संदीपच्या घरी चित्रपटाची कथा ऐकली आमच्या अंगावर काटा आला होता. कथा संपल्यानंतर आमच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. म्हणून मी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.' 
- 7 डिसेंबर 2018 ला तिचा केदारनाथ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2013 मध्ये आलेल्या केदारनाथमधील जलप्रलयावर आधारित हा चित्रपट आहे. 'इस साल करेंगे प्रकृति के क्रोध का सामना और साथ होगा सिर्फ प्यार' अशी चित्रपटाची टॅगलाइन आहे.

 

वादात आहे चित्रपट 
- टीजर लॉन्चनंतर केदारनाथ तीर्थाचे पुरोहित यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. केदारनाथमध्ये पुजा-यांची संघटना केदार सभाचे चेअरमन विनोद शुक्ला म्हणाले - 'जर चित्रपट बॅन केला नाही तर आम्ही आंदोलन करु. आम्हाला माहिती मिळाली आहे की, हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देतो आणि यामुळे हिंदू भावना दुखावल्या जात आहेत.'
- रिपोर्ट्सनुसार शुक्लाने सांगितले की, ज्या वेळी केदारनाथच्या परिसरात चित्रपटाचे अश्लील गाणे चित्रित केले जात होते, तेव्हाही पुजा-यांनी विरोध केला होता.

 

 

बातम्या आणखी आहेत...