आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफ अली खानच्या मुलीपासून ते पत्नीपर्यंत, विना मेकअप दिसल्या या 5 अॅक्ट्रेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्कः सहसा बॉलिवूड अभिनेत्री स्टायलिश ड्रेस आणि मेकअपमध्येच दिसत असतात. पण कधी कधी जेव्हा या अभिनेत्री विना मेकअप घराबाहेर पडतात, तेव्हा कॅमे-याची नजर त्यांच्यावर पडतेच. अलीकडेच सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि पत्नी करीना कपूर खान या दोघीही विना मेकअप कॅमे-यात कैद झाल्या. सारा अली खान बुधवारी संध्याकाळी वांद्रा येथे दिसली. येथे ती डान्स क्लास अटेंड करायला पोहोचली होती. तर करीना नेहमीप्रमाणे जिमबाहेर स्पॉट झाली. अलीकडेच करीनाचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला आहे, ज्यात ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसतेय. 


फिटनेस व्हिडिओ आला समोर.. 
करीनाचा जिममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तिच्यासोबत तिची खास मैत्रीण मलायका अरोरासुद्धा दिसतेय. 'वीरे दी वेडिंग'नंतर करीना अक्षय कुमारसोबत आता 'गुड न्यूज'मध्ये झळकणार आहे. चित्रपटात दिलजीत दोसांज आणि कियारा आडवाणी यांच्याही  महत्त्वाच्या भूमिका असतील. हा चित्रपट 19 जुलै, 2019 रोजी रिलीज होणार आहे. 

 

सुशांतसोबत झळकणार आहे सारा अली खान

सैफ अली खान आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंह यांची मुलगी सारा लवकरच  'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपटात सारासोबत सुशांत सिंह राजपूत मेन लीडमध्ये आहे. यावर्षी 30 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

 

सलूनबाहेर विदाउट मेकअपमध्ये दिसली परिणीती... 

अभिनेत्री परिणीती चोप्रासुद्धा बुधवारी मुंबईतील एका सलूनबाहेर दिसली. दीर्घकाळानंतर ती एका वेगळ्या हेअरस्टाइलमध्ये दिसली. अलीकडेच परिणीतीने अभिनेता अर्जुन कपूरसोबत त्यांच्या आगामी 'नमस्ते इंग्लंड' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. याशिवाय ती अर्जुनसोबतच 'संदीप और पिंकी फरार' या आणखी एका चित्रपटाचे शूटिंग करत आहे. परिणीती चोप्राचा 'नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या 'नमस्ते लंडन'चा सिक्वेल आहे. येत्या 7 डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून विपूल शाह याचे दिग्दर्शक आहेत. 

बातम्या आणखी आहेत...