आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारा अली खानने गुलाबाच्या पाकळ्यांसोबत खेळली होळी, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मंगळवारी (10 मार्च) देशभरात धुळवडीचा सण साजरा केला गेला. अभिनेत्री सारा अली खाननेदेखील हा सण उतसाहत साजरा केला. मात्र तिने रासायनिक रंगांऐवजी गुलाबाच्या पाकळ्यांसोबत होळी खेळली. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या मैत्रिणीसोबत होळी खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून साराने लिहिले, 'बनारसची होळी.' 

साराने एक स्लो मोशन व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती आणि तिची मैत्रीण एकमेकींवर गुलाबाच्या पाकळ्या उधळताना दिसत आहे. यादरम्यान दोघीनींही एकसारखेच ड्रेस परिधान केलेले आहेत. सारा सध्या वाराणसीमधेच (बनारस) आहे. जिथे ती आपला आगामी चित्रपट 'अतरंगी-रे' चे शूटिंग करत आहे. आनंद एल. रायच्या दिग्दर्शनात बनत असलेली या चित्रपटात तिच्या अपोझिट धनुष आणि अक्षय कुमार दिसणार आहेत. या चित्रपटाची रिलीज डेट 14 फेब्रुवारी 2021 ठरवली गेली आहे. 

बातम्या आणखी आहेत...