आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैफच्या मुलीने टायगर श्रॉफच्या चित्रपटात काम करण्यास दिला नकार, दूस-या हिरोइनचा शोध सुरु 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. सारा अली खानचे आतापर्यंत दोन चित्रपट रिलीझ झाले आहेत. सुशांत सिंह राजबूतसोबत 'केदारनाथ' मधून डेब्यू केल्यानंतर साराने रणवीर सिंहसोबत 'सिंबा'मध्ये काम केले. हे दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. यानंतर साराला टायगर श्रॉफच्या 'बागी 3' चित्रपटात अप्रोच करण्यात आले. पण साराने चित्रपटात काम करण्यास स्पष्ट नकार दिला. बागी ही टायगर श्रॉफची यशस्वी सीरिज आहे. यापुर्वी 'बागी' आणि 'बागी 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. 'बागी 3' 2010 मध्ये रिलीज होईल अशी आशा आहे. 

 

एका भितीमुळे साराने चित्रपटाला दिला नकार 
एका रिपोर्टनुसार, साराने टायगर श्रॉफच्या अपोझिट काम करण्यास नकार दिला. कारण या चित्रपटात तिची भूमिका जास्त मोठी नव्हती. तिला फक्त थोडा वेळ स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळणार होती. साराला वाटले की, तिला या चित्रपटात काही खास करता येणार नाही. यामुळे तिने या चित्रपटात रस दाखवला नाही आणि नकार दिला. आता 'बागी 3' साठी नवीन हिरोइनचा शोध सुरु आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...