आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफला अब्बा, करीनाला अम्मा म्हणून हाक मारतो तैमूर, पण साराला ज्या नावाने हाक मारतो ते पाहून तिला स्वतःला वाटले आश्चर्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी सारा अली खान सध्या आपला डेब्यू चित्रपट 'केदारनाथ'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच कारणांमुळे नुकतीच ती एका रेडियो स्टेशनमध्ये पोहोचली होती. साराने येथे चित्रपट प्रमोट केला. यासोबतच तिचा लहान भाऊ तैमूर तिला कोणत्या नावाने हाक मारतो याविषयीही सांगितले. साराने सांगितले की, तैमूर करीनाला अम्मा, सैफला अब्बा, इब्राहिमला भाऊ आणि तिला पाहताच 'गोल' असे म्हणतो. 


तैमूरला नेमके काय म्हणायचे आहे हे सुशांतने समजावले 
- रेडियो स्टेशनवर साराचा को-अॅक्टर सुशांत सिंह राजपूतही उपस्थित होता. तु गोल मटोल आहे म्हणून तैमूर तुला गोल म्हणतो का असा प्रश्न साराला विचारण्यात आला. यावर सारा म्हणते की, का मी खरंच ऐवढी लठ्ठ दिसते का. यावर सुशांत म्हणाला की, तैमूरला तुला गोल्ड म्हणायचे असेल, कारण तुझ्यात खुप चमक आहे, त्याच्यासमोर न्यूकमर्स लाजतात. सुशांतचे बोलणे ऐकूण सारा लाजली आणि त्याला थँक्यू म्हणाली. 

 

साराने करीनाची स्तुती केली 
- साराने आपल्या मुलाखतीदरम्यान आपली सावत्र आई करीनाचे कौतूक केले. ती म्हणाली की, करीनामध्ये फॅमिलीमध्ये बॅलेन्स टिकवून ठेवण्याची कला आहे. ती आपला मुलगा तैमूरची काळजी घेते, सैफ अली खानवर लक्ष ठेवते यासोबतच अॅक्टिंग करिअर सांभाळते, ही खरंच खुप मोठी गोष्ट आहे. सारा म्हणते की, करीनाचे हुनर पाहून मी प्रभावित होते. अभिषेक कपूरच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेला 'केदारनाथ' चित्रपट 7 डिसेंबरला रिलीज होत आहे. 
 

 

 

बातम्या आणखी आहेत...