• Home
  • Gossip
  • Sara Ali Khan searching 'Kuli ...', Varun Dhawan's 'Kooli No. 1' first teaser poster release out

Bollywood / सारा अली खान शोधते आहे 'कुली...', वरून धवनच्या 'कुली नंबर 1' चित्रपटाचे फर्स्ट टीजर पोस्टर रिलीज

फिल्म क्रिटिक तरण आदर्शने केला व्हिडीओ शेअर 

दिव्य मराठी वेब

Aug 11,2019 03:07:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : वरुण धवन आणि सारा अली खान अभिनीत चित्रपट 'कुली नंबर 1'च्या रिमेकचे शूटिंग शुक्रवारी बँकॉकमध्ये सुरू झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन करत आहेत. आज चित्रपटाचा फर्स्ट टीजर पोस्टर रिलीज केला आहे. तसेच उद्या म्हणजेच 12 ऑगस्टला चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले जाणार आहे. फिल्म क्रिटिक तरण आदर्शने आपल्या ट्विटर हँडलवर 'कुली नंबर 1' चे फर्स्ट टीजर पोस्टर शेअर केले आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये दिसते आहे की, वरुण धवन कुली च्या गेटअपमध्ये पूर्णपणे सामानाने झाकलेला दिसत आहे तर सारा अली खान जोरजोरात कुली-कुली ओरडत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी १ मे रोजी रीलीज होईल. वाशु भगनानी, दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी निर्मिती करत आहेत. मूळ चित्रपट १९९५ मध्ये आला होता. यात गोविंदा, करिष्मा कपूर, कादर खान आणि शक्ती कपूरसारख्या कलाकारांचा समावेश होता.

फिल्म क्रिटिक तरण आदर्शची पोस्ट...

X
COMMENT