आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारा-सुशांतच्या फिल्मसाठी केदारनाथच्या मंदिरापासून ते प्रसिद्ध रामबाडा गावाचा सेट मुंबईत करण्यात आला होता तयार, पुराचा सीन चित्रीत करण्यासाठी वापरण्यात आली खास ट्रीक - Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला 'केदारनाथ' हा चित्रपट येत्या 7 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट जून 2013 मध्ये केदारनाथमध्ये आलेल्या महाप्रलयावर आधारित आहे.  'इस साल करेंगे प्रकृति के क्रोध का सामना और साथ होगा सिर्फ प्यार' ही या चित्रपटाची टॅगलाइन आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण 60 दिवसांत पूर्ण केले होते. चित्रपटातील अनेक सीन्स रिअल लोकेशनवर शूट करण्यात आलेले नाहीत. मुंबईतच केदारनाथचे मंदिर आणि गाव रिक्रिएट करण्यात आले होते. चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझायनर मयूर शर्मा यांनी यासंदर्भात DainikBhaskar.com सोबत खास बातचित केली. 


- केदारनाथचे ऐतिहासिक मंदिर मुंबईतील फिल्म सिटीत बनवण्यात आले. चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझायनर मयूर शर्मा यांनी बातचितमध्ये सांगितले, 'केदारनाथ मंदिरात कायम गर्दी असते त्यामुळे आम्हाला कॅमेरा मुवमेंटसाठी जास्त जागेची गरज होती. याशिवाय रिअल लोकेशनचे तापमानही 10 डिग्री सेल्सिअस होते.' 
- त्यांनी पुढे सांगितले की, एवढ्या थंडीत शूटिंग करणे अवघड होते. शिवाय पुरामुळे केदारनाथ मंदिराजवळील रस्त्यांचे खूप नुकसान झाले होते. त्यामुळे आम्ही मुंबईत सेट तयार करण्याचा निर्णय घेतला. तेथील रामबाडा हे गावही आम्ही फिल्म सिटीत उभारले.
- मयूर यांनी सांगितले की, सुशांतचे चित्रपटातील पात्र हे रामबाडा गावातील आहे. शूटिंगसाठी आर्टिफिशिअल बर्फ तयार करण्यात आला. गाव आणि मंदिर फिल्म सिटीच्या मैदानात उभारण्यात आले. 


मुंबईत शूट झाला तीर्थयात्रेचा सिक्वेन्स..
मयूर यांनी सांगितले, 'तीर्थयात्रेचा सिक्वेन्स मुंबईत शूट केला गेला. गावाबाहेरील शूट रिअल लोकेशनवर म्हणजे त्रिजुगी नारायण गावांत शूट झाले. हे ठिकाण सोन प्रयागजवळ आहे. 

 

खोपोलीत शूट झाले पुराचे दृश्य...
चित्रपटाच्या चित्रीकरणाला 60 दिवसांचा कालावधी लागला. याच काळात पुराच्या दृश्याचेही चित्रीकरण झाले. पुराचे दृश्य मुंबईनजीकच्या खोपोलीत चित्रीत करण्यात आले. येथे एका मोठ्या टँकमध्ये घर बनवण्यात आले, जे नंतर पाण्यात बुडताना दिसले. या सिक्वेन्ससाठी तब्बल 50 लाख लीटर पाण्याचा वापर करण्यात आला. मंदिर आणि गावाचा सेट तयार करण्यासाठी तब्बल सहा कोटींचा खर्च झाला.


रिलीजपूर्वीच वादात अडकला चित्रपट...
- या चित्रपटाचा टीजर रिलीज होताच, या चित्रपटाने वाद ओढवून घेतला. टीजर पाहिल्यानंतर उत्तराखंडातील केदारनाथ मंदिरातील पुजा-यांनी या चित्रपटावर तीव्र प्रतिक्रिया देत, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. केदारनाथ हा चित्रपट हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे, असा दावा या पुजा-यांनी केला आहे. 
- केदार सभा या केदारनाथ मंदिरातील पुजा-यांच्या संघटनेचे अध्यक्ष विनोद शुल्का यांनी या चित्रपटाविरोधात आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे. हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार आहे. हिंदूंच्या भावना दुखावणा-या या चित्रपटावर बंदी घातली जावी, अन्यथा आम्ही रस्त्यांवर उतरु, असे शुल्का यांनी म्हटले.  
- उत्तराखंडातील महाप्रलयात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले होते. याच महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटातील जोडप्यास बोल्ड सीन देताना दाखवले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  

बातम्या आणखी आहेत...