आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sara Ali Khan Will Be Seen In Dhanush Anand's Film, Hrithik Roshan Has Also Been Approached

धनुष-आनंद यांच्या चित्रपटात दिसणार आहे सारा अली खान, ऋतिक रोशनलाही केले गेले अप्रोच 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मागच्या महिन्यात धनुषने मुंबईमध्ये आपला हॉलिवूड डेब्यू चित्रपट 'द एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ अ फकीर' चा ट्रेलर लॉन्च केला होता. या प्रसंगी डायरेक्टर आनंद एल रॉयदेखील उपस्थित होते. दोघांनी सोबत रांझणा सारखा हिट चित्रपट केला आहे. या भेटीनंतर असा अंदाज काढला जात आहे की, ते दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. आता असे ऐकिवात आले आहे की, या चित्रपटात सारा अली खानची देखील एंट्री झाली आहे. एका रिपोर्टनुसार, सारा यामध्ये मेन लीडच्या रोलमध्ये असेल. एका महिन्यापूर्वी तिला रायच्या अंधेरी येथील ऑफिसमध्ये स्पॉट केले गेले होते. दोघे दिवसांपासून या चित्रपटाविषयी चर्चा करत आहेत. सारा स्वतः रायच्या कामाची फैन आहे आणि तिला त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. चित्रपटाच्या कास्टिंगवर अजून काम व्हायचे बाकी आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी जानेवारीपर्यंत सुरु होऊ शकतो.  

 

ऋतिकच्या नावाचीही होत आहे चर्चा... 
चित्रपटाशी निगडित सूत्रांनी सांगितले की, चित्रपटात ऋतिक रोशनची देखील एंट्री होऊ शकते. मात्र या चित्रपटात तो कोणती भूमिका साकारणार आहे याबद्दल अद्याप काही माहिती मिळालेली नाही. 

 

वर्कफ्रन्टबद्दल बोलायचे झाले तर सारा अली खान, कार्तिक आर्यनसोबत 'लव्ह आजकल' चित्रपटाचा सीक्वल आणि वरुण धवनसोबत 'कुली नंबर 1' चित्रपटाच्या रीमेकमध्ये दिसणार आहे. तसेच ऋतिक रोशनचा चित्रपट 'सुपर 30' सुपरहिट झाला आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचा चित्रपट 'वॉर' रिलीज होणार आहे. या चित्रपटात ऋतिकसोबत टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. धनुषबद्दल बोलायचे तर त्याने 28 जुलैला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपला अपकमिंग चित्रपट 'पत्तास' चा फर्स्ट लुक रिव्हील केला होता.