आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sara Ali Khan Wishes Brother Ibrahim On Birthday With Photos From Maldives Holiday

सारा अली खानने शेअर केला बिकिनीतील फोटो, सोबत दिसतोय धाकटा भाऊ, ट्रोलर्स म्हणाले- 'ताई, थोडी लाज बाळग'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः सारा अली खानचा भाऊ आणि सैफ अली खान-अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान 19 वर्षांचा झाला आहे. यानिमित्ताने साराने इब्राहिमसोबतची  मालदीव हॉलिडेची काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आणि त्यांच्याबरोबर एक गोंडस कॅप्शन लिहिले. साराने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा भाई. तुला ठाऊक नाही की, मी तुझ्यावर किती प्रेम करते. आज मला तुझी खूप आठवण येतेय. काश आज मी तुझ्याबरोबर असते.'

ट्रोल झाली सारा

साराची ही पोस्ट ट्रोलर्सना काही पसंत पडली नाही. कारण या छायाचित्रात सारा भावासोबत बिकिनीत पोज देताना दिसतेय. ट्रोलर्सनी त्यांना ट्रोल करत अनेक कमेंट लिहल्या. एकाने  लिहिले, ताई थोडी तर लाज बाळग. एका ट्रोलरने लिहेल, तुला आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हेच छायाचित्र मिळाले आहे का? एका यूजरने लिहिले, भावासोबत कोणी अशी पोज देतं का?

सारा बनारसमध्ये शूटिंग करत आहे

सारा इब्राहिमसोबत मुंबईत नाही कारण ती बनारसमध्ये आनंद एल रायच्या आगामी ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. या चित्रपटाचे शूटिंग. मार्चपासून सुरू झाले आहे. या चित्रपटात सारा अक्षय कुमार आणि धनुषच्यासोबत दिसणार आहे.

इब्राहिमला बॉलिवूडमध्ये डेब्यू करायचे आहे

साराप्रमाणेच इब्राहिमलाही बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची इच्छा आहे. स्वत: साराने एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता आणि सांगितले, मी इब्राहिमला सांगितले आहे की शोबीज केवळ ग्लॅमर नाही तर त्यासाठी कठोर परिश्रम देखील आवश्यक आहेत. साराने सांगितले की, तिने इब्राहिमची अनेक नाटकं पाहिली आहेत आणि त्यांच्यात अद्भूत टॅलेंट आहे. 

बातम्या आणखी आहेत...