आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sara Ali Khan With Saif Ali Khan In Koffee With Karan For Kedarnath Promotion, Does She Calls Kareena Mom

सैफला अब्बा म्हणते पण करीनाला छोटी आई म्हणून हाक मारत नाही सारा, स्वतः सैफ म्हणाला होता - आंटी म्हणू नको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. सैफ अली खान रविवारी रात्री लेक सारा अली खानसोबत 'कॉफी विद करण'च्या शोमध्ये आला होता. साराची तिची सावत्र आई करीना कपूरसोबत बॉन्डिंग कशी आहे याविषयावर साराने चर्चा केली. सारा सैफची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी आहे, तर करीना सैफची दूसरी पत्नी आहे. करीना आणि साराच्या वयात अवघ्या 13 वर्षांचेअंतर आहे. अशा वेळी सारा करीनाला कोणत्या नावाने हाक मारेल हा मोठा प्रश्न होता.

 

सैफने आंटी म्हणण्यास दिला होता नकार 
- साराने सांगितले की, तिने करीनाला काय म्हणावे याचा ती विचार करायची. ती करीनाला आंटी म्हणून बोलवू शकते का? तर सैफने तिला आंटी म्हणू नको असे सांगितले होते. साराने सांगितले की, करीनाला छोटी आई म्हण याविषयी सैफने तिच्यावर दबाव टाकला नाही. तिने सांगितले की, तिला करीना किंवा फक्त के म्हणायला आवडते. सारा म्हणते की, तिने करीनाला छोटी आई म्हटले तर करीनाला आवडणार नाही. 


मित्र बनून राहणे पसंत करते करीना
- सारा म्हणते की, करीना मला म्हणते की, तुझ्याजवळ खुप चांगली आई(अमृता सिंह) आहे. यामुळे तिला (करीना) तिच्यासोबत चांगली मैत्रिण बनून राहायचे आहे. साराने सांगितले की, त्यांच्या घरात सर्व आनंदी आहेत. आई(अमृता) तिच्या ठिकाणी आनंदी आहे. सैफ आपल्या ठिकाणी आनंदी आहे आणि करीना तिच्या ठिकाणी आनंदी आहे. करणने सारा विचारले की, तु कधी करीनासोबत शॉपिंगला गेली आहेस का? यावर साराने नकार दिला, पण जाण्याची इच्छा आहे असे ती बोलली. 

 

करीनाच्या नजरेत अशी आहे बॉन्डिंग 
- सैफसोबतच्या लग्नाच्या 11 महिन्यांनंतर करीनाने एका मुलाखतीत तिची मुलांसोबतच्या बॉन्डिंगविषयी सांगितले होते. करीना म्हणाली होती की, दोन्ही मुलांसोबत स्पेशल आणि स्ट्राँग बॉन्डिंग शेअर करते. यासोबतच त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासही मी त्यांना मदत करते. करीना म्हणाली होती की, "आम्ही मित्रांप्रमाणे राहतो, कारण त्यांना अमृताच्या रुपात चांगली आई मिळाली आहे. त्यांनी मुलांचे संगोपन खुप चांगल्या पध्दतीने केले आहे." सारा सैफ आणि करीनाच्या लग्नात सहभागी झाली होती आणि तिचा भाऊ इब्राहिमही करीनासोबत पार्टीजमध्ये दिसत असतो.


सैफच्या पहिल्या लग्नावेळी 11 वर्षांची होती करीना 
- सैफ आणि अमृताचे लग्न 1991 मध्ये झाले होते. त्यावेळी करीना जवळपास 11 वर्षांची होती. या लग्नात ती उपस्थितही होती. यावेळी करीना सैफला शुभेच्छा देतांना अंकल म्हणाली होती, असेही वृत्त आहे. सैफही तिला थँक्यू बेटा म्हणाला होता. 12 ऑगस्ट 1993 ला साराचा जन्म झाला होता. साराच्या जन्माच्या 8 वर्षांनंतर सैफ आणि अमृताचा मुलगा इब्राहिमचा जन्म झाला होता. याच्या तीन वर्षांनंतर म्हणजेच 2004 मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. सैफने 2012 मध्ये करीना कपूरसोबत लग्न केले, आता या दोघांना तैमूर अली खान नावाच एक मुलगा आहे. तैमूरचा जन्म 20 डिसेंबर 2016 मध्ये झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...