आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीचे सोने विकत घेणारा सराफ सचिन महाले याला कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- चोरीचे सोने विकत घेणारा सचिन प्रकाश महाले या सराफास शहर पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले. अशोक इराबत्ती यांच्या घरातून चोरीस गेलेले सोने त्याने विकत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. 


महालेचे मुख्य रस्त्यावर पोपट भगीरथ महाले नावाचे दुकान आहे. इराबत्ती यांच्या घरातून चोरी झाल्यानंतर आठ दिवसांत पोलिसांनी सलिम आयूब शेख, नितीन आवारे, अक्षय ऊर्फ भांग्या बाळू जाधव या आरोपींना पकडले. इराबत्ती यांच्या घरातून दागिने चोरल्याची कबुली त्यांनी दिली. शिवाय हे चोरलेले सोने महाले यास विकल्याचेही सांगितले. काही दिवसांपूर्वी गोरख मुंडलिक या सराफाने चोरीचे सोने घेतल्याच्या संशयावरून त्यास ताब्यात घेण्यासाठी पोलिस गेले असता त्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणात एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे सावध पवित्रा घेत पोलिसांनी तीन दिवस महालेची चौकशी केली. आरोपींकडून ओळख पटवली. त्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई केली. महाले याने अडीच तोळे सोने घेतल्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान अनेक बाबी उजेडात येण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...