आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औषध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरला पाटील   लाडाकोडात वाढलेला कपिल अलीकडे खूप चिडचिड करायचा. आई-बाबा आणि कपिल असे त्यांचे छोटेखानी कुटुंब. आई-बाबा दोघंही नोकरीला. कपिल एकुलता असल्यानं, खेळायला कुणी भावंड नाही, आंजारायला-गोंजारायला मायेची माणसंही नव्हती. आजी-आजोबा गावाकडे. एकटाच असल्यानं कपिलला हवे ते सगळे मिळायचे. मात्र सगळं मिळत असूनही कपिल नाराज असायचा. कारण संध्याकाळी मम्मी-पप्पा घरी आले तरी त्यांच्याच कामात व्यग्र असायचे. पप्पा फोन, व्हॉट‌्सॲप, फेसबुक, कॉम्प्युटरवर व्यग्र असायचे. आई घरकाम, स्वयंपाकात गर्क असायची. या सगळ्यात बिचाऱ्या कपिलची घुसमट व्हायची. म्हणून कपिल नेहमी दिवाळीच्या सुटीची वाट पाहायचा. कधी एकदा आजोळी जातो असे त्याला व्हायचे. आई-बाबाही सुटी लागली की त्याला आजोळी पोहाेचवायचे. आनंदाने प्रत्येकाला सांगायचे, “आमचा कपिल आजोळी छान राहतो. पण कपिलच्या आई-वडलांनी कधी याची कारणं शोधली नाहीत.  आजोळी कपिलला खूप मित्र मिळायचे. मातीतले खेळ, टायर फिरवणे, गोट्या, लपाछपी खेळणे कपिलला आवडायचे. आजीने टाकलेला शेणाचा सडा, रांगोळी आवडायची. लाइट गेल्यावर आजी कोनाड्यातले दिवे काढून स्वच्छ करायची. तेच दिवे ओसरीवर लावून चांदण्याच्या सोबतीने गोष्टी सांगायची. आजी रोपांना लेकरांसारखे पाणी पाजायची. हे सर्व कपिल पाहायचा. तिच्या मागे मागे फिरत अनेक प्रश्न विचारायचा. वर्षभर न मिळालेला आनंद, प्रेम, समाधान त्याला या दहा दिवसांत मिळायचे. हा सगळा दिनक्रम आई-बाबांना कळाला. त्यांना खरे औषध मिळाले. कोवळ्या मनाच्या अशा कपिल ना मायेच्या ऊबेने जपले पाहिजे. सिमेंटच्या जंगलात बालपण खुरटत चालले आहे. बालपणाचे योग्य सिंचन झाले पाहिजे. 

लेखिकेचा संपर्क : ९४२३९१८३५०