आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल फळ्याचं जग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरला पाटील

शाळा म्हणजे विद्यार्थी नावाच्या फुलवेलीला बहर आणणारी जागा. योग्य खतपाणी घालून ही फुलवेल बहरवणारा माळी म्हणजे शिक्षक. फक्त आज सेकंदागणिक बदलणाऱ्या जगात तंत्रज्ञानाचे खतपाणी घालणे आवश्यक झाले आहे.


तंत्रज्ञानाने आज जग जोडले गेले आहे. तंत्रज्ञान ही आधुनिक काळाची गरज ठरली आहे. आज प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान वेगाने मूळ रोवत आहे. आज बालवयातच मुले स्मार्ट टीव्ही, मोबाइल, कॉम्प्युटर, प्रोजेक्टर हाताळायला लागली आहेत. त्यातील विविध बटणे, विविध ॲप्लिकेशन वेगवेगळे भाग मुलांना माहीत आहेत आणि असावेतही. जरी एकच शिक्षक एकच विषय एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना शिकवत असला तरी प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगवेगळी असते. आज तळागाळापर्यंत तंत्रज्ञान पोहोचावे  म्हणून प्रयत्न झाले आणि जवळजवळ सर्वच शाळादेखील डिजिटल झाल्या. फळ्याची जागा काही वेळेपुरती प्रोजेक्टर, टीव्ही, मोबाइलने घेतली. त्यामुळे मुलांचे अध्यापन सुलभ आणि मनोरंजक झाले. एकाच घटकाचा सराव अधिक वेळा  घेता येऊ लागला. शिकणे आणि शिकवणे दोन्ही रस्ते सुकर आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या नावीन्यपूर्ण परिणामकारक शिक्षणप्रणालीमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होत आहे. अॉनलाइन माहिती स्रोतामुळे प्रगतीच्या अनेक वाटा मोकळ्या झाल्या आहेत. यूट्यूबवरील शैक्षणिक व्हिडिओ, विविध शैक्षणिक ॲप, वेबसाइट यामुळे शिक्षणाची गती वाढली आहे. दीक्षा ॲपसारख्या सुविधेमुळे प्रत्येक पाठ मुलांना आणि पालकांनाही पाहता येतो. म्हणूनच मुलांना अभ्यासक्रमात संगणक शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. अगदी कोणत्याही बारीकसारीक गोष्टीसाठी माहितीच्या महाजालावर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. डिजिटल वैविध्ये 

  • डिजिटल फळ्याने शाळा झाल्या ज्ञानाच्या धनी
  • श्रम गुरूंचे आणि तंत्रज्ञानाने मुले झाली ज्ञानी-गुणी
  • टॅबलेट किंवा लॅपटॉपवर सहजतेने बडबडगीते, चित्रमय बोधकथा, कृतियुक्त कविता, छोटी नाटके, शब्द, चित्रकला, कार्यानुभव विषयाचे उपक्रम पाहून समृद्ध होत आहेत. हे तंत्रज्ञ बालक उद्याचे भवितव्य आहे.

लेखिकेचा संपर्क  :९४२३९१८३५

बातम्या आणखी आहेत...