आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सारथी’ संस्थेची स्वायत्तता अबाधित, 50 कोटी रुपयांची तरतूद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तृतीयपंथीय समाजाच्या कल्याणासाठी तसेच त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी राज्यात स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केलेल्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात केली.  लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या शिक्षणाची पुढच्या वर्षी शताब्दी आहे. त्यानिमित्त या स्कूलमध्ये बाबासाहेबांच्या नावाने अध्यासन सुरी करण्यात येणार आहे. पुणे येथे नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी १ हजार निवासी क्षमतेचे वसतिगृह बांधण्यात येणार असून मुंबई व पुणे विद्यापीठात मागासवर्गीय मुलामुलींसाठी ५०० निवासी क्षमतेचे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळास पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हज यात्रेकरूंच्या सुविधेसाठी ठाणे जिल्ह्यात मुंब्रा -कळवा येथे हज हाऊस बांधले जाणार आहे. तसेच अनुसूचित जाती-जमाती विद्यार्थ्यांच्या धर्तीवर अल्पसंख्याक समुदायातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार असून या योजनेसाठी २०२०-२१ वर्षासाठी १२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे या संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केली. तसेच संस्थेच्या सन २०२०-२१ वर्षासाठीच्या कामासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

विभागवार निधीची घोषणा 

१. सामाजिक न्याय विभागासाठी ९६६८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
 
२. आदिवासी विकास विभागाला ८८५३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

३. इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाला ३००० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

४. अल्पसंख्याक विकास विभागाला ५५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

वंचितांना ३५ % वाटा : राज्याचा सन २०२०-२१ चा महसुली खर्च ३ लाख ५६ हजार ९६८ कोटी असून त्यातील ३५ टक्के निधी आदिवासी, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक व बहुजन कल्याण या चार विभागांना म्हणजेच राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या वाट्यास आला आहे.

बातम्या आणखी आहेत...