आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सारथी'ची स्वायत्तता कायम राहणार; इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : सारथी संस्थेची स्वायत्तता रद्द करण्याचा कोणताही विचार नसून ती कायम ठेवली जाईल. तसेच आगामी दहा दिवसात फेलोशिप घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यात फेलोशिपचे पैसे वळते केले जातील. संस्थेच्या कामकाजात झालेल्या अनियमिततेबाबत चौकशी करण्यात आलेल्या अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवालही १० दिवसात येईल. अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.

वैभव नाईक, सुनील प्रभू, राहुल कुल यांनी मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेत अनियमितता झाल्याची लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती. वडेट्टीवार यांनी सांगितले, विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या पैशांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवार यांनी सांगितले, जे विद्यार्थी दिल्ली येथे युपीएससी परीक्षेचे प्रशिक्षण घेत आहेत, त्यांच्या फेलोशिपचे पैसे दिले जातील युपीएससी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना उपस्थितीची अट ७० टक्के होती ती आम्ही ६० टक्क्यांवर आणली. मात्र काही विद्यार्थी ३५ टक्केच उपस्थित होते आणि तरीही ते फेलोशिप मागत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...