आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- 'साडी ही भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे पुरुषांनीदेखील साडी नेसावी.' काय?...असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आश्चर्यचकित होऊ नका कारण हे वाक्य आहे दिल्लीच्या हिमांशू वर्मा या तरुणाचे. हिमांशू साडी नेसण्याला अभिमानाची बाब समजतो. आजच्या काळात तरुणी तरुणांसारखेच कपडे परिधान करतात. पूर्वी तरुण-तरुणींचे कपडे अगदी वेगळे असल्याने दोघेही एकमेकांचे कपडे परिधान करत नव्हते. परंतू आज तरुण- तरुणींनी या विचारांना मागे टाकले आहे. आज आम्ही तुम्हाला याच हिमांशू वर्माबद्दल सांगणार आहोत.
'साडी मॅन' हिमांशू वर्मा
दिल्लीत राहणारा हिमांशू वर्मा मागील 12 वर्षांपासून साडी नेसत आहे. हिमांशूची साडी नेसण्यामागची गोष्टही गमतीशीर आहे. संपूर्ण दिल्लीत 'साडी मॅन' नावाने ओळख असणाऱ्या हिमांशूला साडी नेसण्याची मोठी हौस आहे. 'जगभरात साडी नेसल्यानंतर खुलणाऱ्या सौंदर्या'ला पटवून देणे हे हिमांशूचे उद्दिष्टे आहे. हिमांशू लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी 'साडी फेस्टिवल'चे आयोजनही करतो.
'साडी मॅन' हिमांशूने लोकांना भारतीय संस्कृतीतील साडीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि पुरुषांदेखील साडी परिधान करावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधित Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.