दुष्टकाळाशी महायुद्ध / दुष्टकाळाशी महायुद्ध : उन्हापासून रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने डाळिंबाच्या झाडांना बांधल्या साड्या

२० रुपयांना एक याप्रमाणे सातशे साड्या सुरत येथून एकदम खरेदी केल्या. 
 

दिव्य मराठी

May 08,2019 09:09:00 AM IST

अमरावती - साडी डाळिंबी हीच मी लेईन, अशीच मला आयन्यात पाहीन...वैशाख वणवा चित्रपटातील या गीताची आठवण करून देणारे हे छायाचित्र. या गीतामध्ये ठसका होता, परंतु इथे मात्र चटका आहे...! त्यापासून झाडे वाचवण्यासाठी शेतमालकाने डाळिंबाची अख्खी बागच साड्यांनी झाकली आहे.

> साड्यांमुळे उन्हापासून डाळिंबाच्या झाडाचे, सोबत फळांचेही संरक्षण होत आहे.
> चार वर्षांपूर्वी लावलेली डाळिंबाची बाग या वर्षी बहरली होती. मात्र, दुष्काळ व उन्हामुळे झाडे सुकण्याचा धोका पाहता देशमुख यांनी ही उपाययोजना केली.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कापूस तळणी या गावात शेतकरी नीलेश देशमुख यांनी सातशे झाडांच्या संरक्षणार्थ अशा साड्या गुंडाळल्या आहेत.

X