Home | TV Guide | Sargun Mehta Dance Video Viral on social media

'तू चीज बड़ी है मस्त-मस्त' या गाण्यावर जबरदस्त नाचली टीव्हीच्या सुपरस्टारची पत्नी, पब्लिक इव्हेंटचा व्हिडीओ होत आहे व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 12:09 AM IST

टीव्ही शोमध्ये काम करता करता जडले एकमेकांवर प्रेम , अभिनेत्याने गुडघ्यावर बसून केले होते प्रपोज...

  • एंटरटेन्मेंट डेस्क : '12/24 करोल बाग' आणि 'अपनों के लिए गीता का धर्मयुद्ध' अशा सीरियल्समध्ये लीड अक्ट्रेस म्हणून काम केलेली अभिनेत्री सरगुन मेहताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती 'तू चीज बड़ी है मस्त-मस्त' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. स्वतः सरगुनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला आहे, त्यासोबत तिने लिहिले, "करंट मूड". हा व्हिडीओ सुरुवातीच्या 17 तासातच 4 लाखपेक्षाही जास्त लोकांनी पहिले आहे. व्हिडीओ कोणत्यातरी पब्लिक इव्हेंटच्या दिसत आहे. सरगुन यामध्ये आणखी एका मुलीसोबत डान्स करत आहे.

    पंजाबी अक्ट्रेस आणि टीव्हीच्या सुपरस्टार रवि दुबेची पत्नी आहे सरगुन...
    - सरगुन सध्या पंजाबी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ती तेथे A-लिस्टर अक्ट्रेसेसमध्ये गणली जाते. तिने 'अंग्रेज', 'जिंदुआ' आणि 'किस्मत' यांसारख्या पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. सरगुन 'जमाई राजा' सारख्या शोजमधून ऑडियंसमध्ये प्रसिद्ध असलेला अभिनेता रवि दुबे याची पत्नी आहे. रविने सरगुनला 'नच बलिए' सीजन 5 मध्ये गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. शोमधून बाहेर येताच कपलने 7 डिसेंबर, 2013 ला लग्न केले. मात्र, खूप कमी लोकांना माहित आहे की, '12/24 करोल बाग' (2009-2010) दरम्यान ते जवळ आले होते. दोघे या शोमध्ये लीड कपल म्हणून काम करत होते.

Trending