आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सच्चा कलाकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. गिरीश कर्नाड हे दि. १० जूनला काळाच्या पडद्याआड गेले. मागे आपले विचार, अभिनय व साहित्य ठेवून. अतिशय हुशार, उत्तम कलाकार आणि काही आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तम दर्जाचे जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व.  

मला त्यांच्यातील अभिनय भावला तो ‘शंकरा भरणम‌्’ याच्या हिंदी रिमेकमधील "सूरसंगम’ यातील "पंडित शास्त्री’ या भूमिकेमध्ये. एकही संवाद न बोलता, नुसत्या चेहऱ्यावरील बदलत जाणाऱ्या भावनांमधून जरब, राग, आनंद आणि अपेक्षित गोष्ट असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले आहे. त्यातील शास्त्रींची भूमिका त्यांनी अतिशय समर्थपणे पेलल्यामुळे ती भूमिका आणि ती शास्त्रींच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशी झाल्यामुळे त्यांच्यामधील समर्थ अभिनेता आपल्याला भावतो आणि ती व्यक्तिरेखा उच्चतम स्तरावर जाते आणि आपण त्यांच्या अभिनयाच्या प्रभावाखाली येतो. 


    तीच गोष्ट ‘स्वामी’ या सिनेमातील अभिनयाची. या भूमिकेतही त्यांनी त्या भूमिकेमध्ये शिरून त्या भूमिकेला उत्तम न्याय दिला होता. त्यांचे एक वैशिष्ट्य होते की, ते भूमिकेचा उत्तम अभ्यास करत व मग ती साकारत. 


   एखाद्या नटातील अभिनय क्षमता ओळखून त्याला संधी देण्याची त्यांची इच्छा व कृती हेही स्तुत्य. त्यांच्यातील अभिनयक्षमता व त्यांच्यातील प्रतिभा ही भूमिकेतून व्यवस्थित दिसून येते. अशा या अभिनयसम्राटाला 
त्रिवार सलाम... 
 

बातम्या आणखी आहेत...