Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Sarpanch Lanke's said about government-owned liquor shops

अवैध धंद्यांपेक्षा सरकारमान्य दारूची दुकाने चालू झालेली बरी; लंके यांचे सूतोवाच

प्रतिनिधी | Update - Aug 30, 2018, 09:36 AM IST

गावातील अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून दिवसाढवळ्या तलवारी घेऊन गंुड फिरत आहेत.

 • Sarpanch Lanke's said about government-owned liquor shops

  निघोज- गावातील अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून दिवसाढवळ्या तलवारी घेऊन गंुड फिरत आहेत. या अवैध व्यवसायांपेक्षा सरकारमान्य दारूची दुकाने चालू झालेली बरी, असे प्रतिपादन सरपंच ठकाराम लंके यांनी ग्रामसभेत करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. दारूबंदी उठवण्याचा ठराव आगामी ग्रामसभेत मंजूर होणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.


  आठ दिवसांपूर्वी सरपंच लंके यांना एका दारूविक्रेत्याने तलवार दाखल्याची चर्चा परिसरात होती. मात्र, याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. सरपंच लंके यांनी ग्रामसभेत तलवारीच्या विषयाला दुजोरा देत अवैध धंद्यापेक्षा रितसर दारूचे दुकाने सुरू झालेले बरे, असे वक्तव्य त्यांनी केल्याने लवकरच दारूबंदी उठवली जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे.


  १५ अॉगस्टला ग्रामसभा न होता ती बुधवारी कपिलेश्वर मंगल कार्यालयात घेण्यात आली. सकाळी १० वाजता सुरू झालेली ग्रामसभा तब्बल अडीच तास चालली. ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चेत ग्रामस्थ सहभागी झाले होते. विकासकामात सरपंच सदस्यांना विश्वासात घेत नाही, एककल्ली कारभार सुरू असून कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत अाहे. असाच कारभार चालू राहिल्यास गावाचे मोठे नुकसान होणार असून हा हुकूमशाही कारभार बंद न झाल्यास आम्हाला ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्याचा अधिकार नाही, आम्ही राजीनामा देऊ, असे विरोधकांनी सांगितले.


  सरपंच लंके यांनी मात्र विकासकामे मोठ्या प्रमाणात व योग्य पद्धतीने सुरू असल्याचा दावा केला. मला अधिकाऱ्यांनी क्लिनचीट दिली असून आपण योग्य पद्धतीने कामे करत असल्याने जनतेचे आपल्याला पाठबळ मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सरपंच लंके यांनी दिले. ग्रामसेवक बी. जे. दातीर यांनी झालेल्या विकासकामांची व नियोजित विकासकामांची माहिती दिली.


  ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ, सुधामती कवाद, भीमराव लामखडे, भास्कर वराळ, दत्तात्रय गुंड, विठ्ठलराव कवाद, पप्पू लामखडे, उमेश सोनवणे, बाळासाहेब लामखडे, सुनील पवार, मंगेश वराळ, अर्जुन लामखडे, सावकार लंके, अनिल शेटे, विलास हारदे, संतोष वराळ, दत्तात्रय घोगरे, शंकर गुंड, राहुल गुंड, अनिल लामखडे, बाबाजी तनपुरे, ज्ञानेश्वर लंके, साजिदभाई तांबोळी, राजेंद्र लाळगे, माउली वरखडे आदींनी चर्चेत भाग घेतला. उपसरपंच बाबाजी लंके यांनी आभार मानले.


  सभेला अवैध व्यावसायिकांची संख्या मोठी
  गेल्या अनेक महिन्यांपासून निघोजची वार्षिक सभा शांततेत होत नाही. या सभेला अवैध व्यावसायिकांची संख्या मोठी असल्याने काही तरी विशेष ठराव मांडला जाणार असल्याची चर्चा होती. सरपंच लंके यांनी सरकारी दारूची दुकाने सुरू होण्याची गरज असल्याचे सांगताच टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आल्याने ग्रामसभा संपल्यावर वेगळीच चर्चा सुरू झाली.

Trending