Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Sarpanch, Member and Gramsevak loacked in Gram Panchayat

सरपंच, सदस्य व ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीत कोंडले...

प्रतिनिधी | Update - Aug 07, 2018, 12:11 PM IST

तीन महिन्यांत सुविधा पुरवण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर टाळे काढण्यात आले.

  • Sarpanch, Member and Gramsevak loacked in Gram Panchayat

    राहुरी शहर- पिण्याच्या पाण्याबरोबरच इतर सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या उंबरे ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य व ग्रामसेवकाला आदिवासी वसाहतीतील ग्रामस्थांनी तब्बल अडीच तास ग्रामपंचायतीत कोेंडून ठेवल्याने खळबळ उडाली. तीन महिन्यांत सुविधा पुरवण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर टाळे काढण्यात आले.


    उंबरे गावापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या डाग वस्ती येथील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी उंबरे बसस्थानकापासून हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयाला आंदोलन छेडले. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्रा पाहून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांची भंबेरी उडाली. दीड हजार लोकवस्ती असलेला डागवस्ती भाग सोयी-सुविधांपासून वंचित आहे. या वस्तीवरील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चौदाव्या वित्त अायोगातून २ लाख २० हजार रुपये खर्चाची वाहिनी मंजूर करण्यात आली होती. मात्र, एक किलोमीटरनंतर पुढील काम बंद करण्यात आले. या कामाचा प्रत्यक्ष खर्च १ लाखाच्या आत असताना दुप्पट दाखवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. गटविकास अधिकाऱ्यांना बोलवेपर्यंत ग्रामपंचायतीचे टाळे काढणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.


    अखेर ग्रामपंचायत प्रशासनाकडून ३ महिन्यांत सुविधा पुरवण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यावर ग्रामपंचायतीचे टाळे काढून अडीच तास कोंडलेल्या पदाधिकारी, सदस्य व ग्रामसेवकाची सुटका करण्यात आली. या आंदोलनात डागवस्तीवरील महिला, तसेच लहान मुलेही सहभागी झाली होती.

Trending