आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरसंघचालक मोहन भागवतही ट्विटरवर; संघाची अलिप्त परंपरा खंडित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेसुद्धा ट्विटरवर आले आहेत. भागवतांसह संघाच्या बड्या नेत्यांनीही संवादासाठी ट्विटरवर पदार्पण केले आहे. संवादासाठी आजवर फारशी उत्सुकता न दाखवणाऱ्या संघानेत्यांचे सोशल मीडियावर पदार्पण चर्चेचा विषय ठरत असून संघाच्या भूमिकेतील बदलाच्या दृष्टीने त्याकडे पाहिले जात आहे. सोशल मीडियावर संघ सक्रिय असला तरी संघाचे सरसंघचालक कधीच सोशल मीडियावर आलेले नव्हते. मात्र, भागवत यांच्यासह संघाचे सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, व्ही. भगैया, अरुणकुमार आणि अनिरुद्ध देशपांडे या प्रमुख नेत्यांनीही ट्विटरवर पदार्पण केल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. पदार्पण करताना भागवत यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया अथवा मत ट्विटरवर मांडलेले नाही. मात्र, काही तासांतच त्यांचे हजारो फॉलोअर्स बनले आहेत. 


अलिप्त परंपरा खंडित
गेल्या वर्षी भागवत यांनी दिल्ली येथील संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून संघाची प्रसारमाध्यमांपासून अलिप्त राहण्याची परंपरा खंडित केली होती. तत्पूर्वी, संघाने आपला पारंपरिक गणवेश बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याच मालिकेत आता संघनेत्यांचे सोशल मीडियावरील पदार्पणाकडेही पाहिले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...