आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपतींचे वंशज भाजपच्या छत्रछायेखाली; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा कार्यकर्त्यांच्या बैठकांवर जोर, भाजपात जाण्याचा आग्रह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- राज्यात सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार, नेते राष्ट्रवादी काँग्रेसला धक्के देत असताना आपण तरी मागे का रहावे असा विचार करून सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सध्या कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठका घेवुन मते जाणून घेत आहेत. कार्यकर्ते मात्र त्यांना भाजपात जाण्यबाबत आग्रह धरत असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव आणणे सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे नजिकच्या दोन दिवसात सातारा जिल्ह्यात राजकीय घमासान होणार हे, निश्चित आहे.


सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे हेवी-वेट नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये जावेत असा कार्यकर्त्यांचा आग्रह वाढत आहे. आज(29 जुलै) शिवेंद्रराजे भोसले यांच्या निवासस्थानी सातारा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यात कार्यकर्त्यांचा शिवेंद्रराजेंवर भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रह धरण्यात आला आहे. कार्यकर्ते आणि मतदारसंघाच्या हिताचा योग्य तो निर्णय घेणार असल्याची शिवेंद्रराजे यांनी यावेळी ग्वाही दिली. उद्याही दुपारी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 

छत्रपतींचे वंशज भाजपच्या छत्रछायेखाली 

सातारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते पण समयसूचकता राखून असतात असेच दिसतंय. पाऊस लागू नये म्हणून का आगामी वाटचाल दिसावी म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या डोक्यावर भाजपाचीच छत्री धरल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...