आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

400 किमी उंचीवरूनही दिसतो जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी, अमेरिकेने जारी केला फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - गुजरातच्या अहमदाबादेत नर्मदा नदीच्या किनारी उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच सरदार पटेल यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी अवकाशातूनही स्पष्ट दिसतो. अमेरिकेच्या कमर्शियल सॅटेलाइट नेटवर्क- प्लॅनेटने शुक्रवारी 182 मीटर (597 फूट) उंच पुतळ्याचा अवकाशातून टिपण्यात आलेला एक फोटो ट्विट केला. हा फोटो 15 नोव्हेंबर रोजी 400 किमी उंचीवरून काढण्यात आला होता. 

 

स्पेसमधून दिसतात फक्त मोजके स्ट्रक्चर

- सरदार पटेलांच्या या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. हा 597 फूट उंच आहे. म्हणजे 305 फूटांच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा याची उंची दुप्पट आहे. यासोबतच स्टॅच्यू ऑफ युनिटी हा अशा काही मानवनिर्मिती कलाकृतींपैकी आहे, जे पृथ्वीच्या अवकाशातूनही दिसतात. दुबईच्या तटावर बनलेले पाम आयलँड. चीनची भिंत आणि इजिप्तचे ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा याही अशाच मानवनिर्मिती कलाकृती आहेत, ज्या अवकाशातून एकदम स्पष्ट दिसून येतात.

 

इस्रोकडून सॅटेलाइट लाँच केलेला आहे या कंपनीने
- स्टॅच्यू ऑफ युनिटीचा फोटो जारी करणाऱ्या अमेरिकी कंपनीचे नाव स्कायलॅब आहे. 2017 मध्ये इस्रोने एकत्र 104 सॅटेलाइट लॉन्च करण्याचा विक्रम रचला होता. तेव्हा यात 88 डव्ह सॅटेलाइट स्कायलॅब कंपनीचेच होते.

 

गतमहिन्यात झाले स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन
- स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. सरदार पटेल यांचा हा पुतळा गुजरातच्या केवडियामध्ये नर्मदा नदीवर असलेल्या सरदार सरोवर धरणावर उभारण्यात आला आहे. हा पुतळा 7 किलोमीटर अंतरावरूनही दिसतो. याच्या बांधकामासाठी 5 वर्षांचा काळ लागला. हा जगात सर्वात कमी काळात उभारण्यात आलेला पुतळा आहे. याच्या निर्मितीसाठी 2990 कोटी रुपयांची रक्कम लागली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...