आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Satellite Right 'Sai Ra Narasimha Reddy' Movie Sold For Rs 125 Crore, Becomes South's Most Expensive Movie

'सई रा नरसिम्हा रेड्डी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 125 कोटी रुपयांमध्ये विकले गेले चित्रपटाचे सॅटेलाईट राइट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'सई रा नरसिम्हा रेड्डी' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. चित्रपटाचा ट्रेलर खूपच जबरदस्त अॅक्शनने भरलेला आहे. त्यामुळे ट्रेलर प्रेक्षकाला खिळवून धरतो. तसेच सॅटेलाईट राइटच्या बाबतीत चिरंजीवी आणि अमिताभ बच्चन स्टारर 'सई रा नरसिम्हा रेड्डी' साउथ इंडियाचा सर्वात महागडा चित्रपट बनला आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे सॅटेलाईट राइट 125 कोटी रुपयांमध्ये झी नेटवर्कला विकले गेले आहेत. यापूर्वी रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर '2.0' या बाबतीत सर्वात पुढे होते. या चित्रपटाचे सॅटेलाईट राइट्स झी नेटवर्कनेच 110 कोटी रुपयांना खरेदी केले होते.  

 

उयाल्लवाडा नरसिम्हा रेड्डी यांची आहे कथा... 
सुरेंदर रेड्डी यांच्या दिग्दर्शनामध्ये बनलेला हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये 1857 मध्ये झालेल्या प्रथम स्वातंत्र्य संग्रामापूर्वीची कथा दिसणार आहे, जेव्हा फ्रीडम फायटर उयाल्लवाडा नरसिम्हा रेड्डी यांनी इंग्रजी सरकारविरुद्ध विद्रोह केला होता. चित्रपटात रेड्डीच्या रोलमध्ये चिरंजीवी दिसणार आहे. त्यांच्या आणि अमिताभ बच्चन यांच्याव्यतिरिक्त नयनतारा, रवि किशन आणि सुदीप यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपट 2 ऑक्टोबरला हिंदी, तमिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये रिलीज होईल.  

बातम्या आणखी आहेत...