Home | Gossip | Satish Kaushik said, "I want Salman to play the main role in 'Tere Naam 2'

दिग्दर्शक सतीश कौशिक म्हणाले - माझी इच्छा आहे 'तेरे नाम 2'मध्ये सलमानने साकारावी मुख्य भूमिका   

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 12:15 PM IST

सुपरहिट ठरेल हा सिक्वेल 

  • Satish Kaushik said,

    एंटरटेन्मेंट डेस्क : दिग्दर्शक सतीश कौशिकने या वर्षी 'तेरे नाम' चित्रपटाचा सिक्वल बनवण्याची घोषणा केली होती. या चित्रपटावर दोन ते तीन वर्षांपासून चर्चा हाेत आहे. हा चित्रपट पहिल्या कथेपेक्षा वेगळा असेल आणि तो एका उत्तर भारतीय गँग्स्टरवर आधारित असल्याचे ते म्हणाले हाेते. या चित्रपटात सलमाननेच मुख्य भूमिका करावी, अशी सतीशची इच्छा आहे. मात्र, सध्या तरी ते अशक्य वाटत आहे. सूत्राच्या माहितीनुसार..., सलमानने यापूर्वी या सिक्वेलमध्ये काम न करण्याचे म्हटले होते. शिवाय तो यावर्षी 'इंशाअल्लाह', 'दबंग' आणि नंतर 'किक 2'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या बरोबरच तो एक कोरियाई चित्रपट वेटेरनचादेखील हिंदी रिमेक करणार आहे. तर पाहू या व्यग्रतेतून सलमान खरचं वेळ काढेल का?

Trending