आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सट्टेबाजारात भाजपला 244 ते 247 जागा मिळण्याचा अंदाज, तर काँग्रेसला 80 जागा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 19 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पाडले. अशातच देशात कोणाचे सरकार येईल याबाबत 19 मे रोजी संध्याकाळी ओपिनियन पोल समोर आला. पण सट्टेबाजारात देशात एनडीएचे सरकार येणार असल्याची शक्यता एक्झीट पोल समोर येण्याअगोदरच वर्तवण्यात आली होती. 

 

एनडीए सरकारला मिळणार बहुमत

बिझनेस स्टँडर्डच्या बातमीनुसार सट्टे बाजारात भाजपाला 244 ते 247 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला सत्ता स्थापनेसाठी सहयोगी पक्षांचे समर्थन घ्यावे लागेल. सट्टा बाजारात भाजपच्या सहयोगी पक्षांना 40 जागा मिळणार असल्याचे सांगितले. यामुळे एकूण संख्याबळ 290 च्या पार पोहोचते. या संख्याबळावर एनडीए सहजरित्या सरकार स्थापन करू शकतो. 

 

उत्तर प्रदेशात एनडीएला मिळणार 42 जागा

यापूर्वी मार्चमध्ये सट्टा बाजार भाजपला 245 ते 251 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करत होता. दर दूसरीकडे काँग्रेसला 80 जागा मिळणार असल्याचे दिसत होते. या बाजाराच्या अनुमानानुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळत नाहीये. अशात घटक पक्षांचे महत्व वाढणार आहे. इतर राज्यासंबंधी सांगायचे झाले तर तो भाजपचे नेतृत्व असणाऱ्या एनडीए सरकारला गुजरातमध्ये 23, उत्तर प्रदेशमध्ये 42 जागा मिळण्याचे अनुमान आहे. तर महाराष्ट्रात 22, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 21 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.