आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या या 'तरुण' नेत्याचा उत्साह पाहून सातारकर हैराण, शरद पवारांचा भरपावसात उदयनराजेंवर घणाघात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज(18 ऑक्टोबर) साताऱ्यात जोरदार पाऊस सुरू असताना सभा घेत उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. "चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली, ही चूक दुरुस्त करण्याची संधी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आहे", असे पवार म्हणाले. सभा सुरू असताना पाऊस पडू लागला, मात्र शरद पवार यांनी भाषण न थांबवता भर पावसात कार्यकर्त्यांचे संबोधन सुरुच ठेवले. त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावून गेले. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमी त्यांच्या उर्जेसाठी ओळखले जातात. इतके वय होऊनही ते ज्याप्रकारे प्रचार करत आहेत त्याबद्दल अनेकदा कार्यकर्तेही आश्चर्य व्यक्त करतात. आज तर साताऱ्यात भर पावसात शरद पवार बोलत राहिले. यावेळे शरद पवार म्हणाले की, "आपल्या हातून काही चूक झाली तर ती मान्य करायची असते, लोकसभेच्या वेळी मी चूक केली हे मान्य करतो. मला आनंद हा आहे की ही चूक दुरुस्त करण्यासाठी सातारकर 21 तारखेची वाट बघत आहेत. श्रीनिवास पाटील यांना मोठ्या मतांनी विजयी करतील, हा मला विश्वास वाटतो" असेही पवार म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या स्वागतासाठीच हा पाऊस पडत आहे.शरद पवार म्हणाले, "या निवडणुकीत कुस्ती वगैरे काही नाही. येणाऱ्या 21 तारखेला तुमच्या मतदानाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला सातारा जिल्हा शब्दाला पक्का आहे आणि चुकीच्या गोष्टीला नाकारणारा असल्याचा संदेश मिळेल. सातारा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जतन करणारा आहे. तोच विचार तुम्हाला करायचा आहे. तो निश्चित कराल." असे पवार म्हणाले. तसेच, "ही निवडणूक महत्त्वाची आहे. देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते, एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात आमचे पैलवान आखाड्यात उतरले आहेत. मात्र समोर कोणी दिसतच नाही, भाजपावाल्यांच्या तोंडी कुस्ती, पैलवान हे शब्द शोभतच नाहीत," असं शरद पवार म्हणाले. 21 तारखेला परिवर्तन नक्की घडेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागतासाठी साक्षात वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे सातारा जिल्हा चमत्कार घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

बातम्या आणखी आहेत...