आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

शनिवार 11 जानेवारी रोजी पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. या सात राशीच्या लोकांना वाद आणि व्यर्थ खर्चाला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

 • मेष: शुभ रंग : मोरपंखी | अंक : १

वास्तू व वाहन खरेदीसाठी केलेले कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील. काही आदरणीय आप्तेष्ट मोलाचे सल्ले देतील. आज प्रेमप्रकरणांत वेळ वाया घालवू नका. 

 • वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : ३

नवकवींची लिखाणे प्रसिध्द होतील. प्रवासात  महत्वपूर्ण ओळखी होतील. पूर्वीचे गैरसमज विसरून शेजारी  जवळ येतील. ज्येष्ठ मंडळींना मुलांकडून  सुवार्ता  येतील. 

 • मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ४

आवक चांगली असल्याने पैशाअभावी रखडलेले काही उपक्रम पुढे रेटता येतील. आज जिभेवर साखर  व डोक्यावर बर्फ ठेऊन आपला स्वार्थ साधून घ्यावा.

 • कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : २

आज स्वत:चेच न चालवता इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. मौजमजा करताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. 

 • सिंह : शुभ रंग : क्रिम | अंक : ५

गाठीशी असलेल्या पैशाची भविष्यकाळाच्या दृष्टीने योग्य गुंतवणूक कराल. कंजूषपणा न करता सहकुटुंब  करमणूकीसाठी सढळहस्ते खर्च कराल. प्रवास होतील.

 • कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : ६

अत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून कार्यक्षेत्रातील तुमच्या पूर्वीच्या कष्टांना यश मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. मित्रमंडळी तुमचा हेवा करतील.

 • तूळ: शुभ रंग : गुलाबी | अंक : ९

कार्यक्षेत्रात काहीसा मानसिक तणाव जाणवेल. काही मनाविरूध्द घटना तुम्हाला बेचैन करणार आहेत. तुम्हाला जोडीदाराकडे  मन मोकळे करावेसे वाटेल.

 • वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७

निस्वार्थीपणे काही कंटाळवाणी कामेही करावी लागतील. आवक पुरेशी असली तरही बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. नास्तिक मंडळीही देवाला  एखादा नवस बोलतील.

 • धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ८

आर्थिक अंदाज कोलमडणार आहेत. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागायचा मोह अंगाशी येईल. प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. प्रलोभनांपासून जपायला हवे. 

 • मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : ६

स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही हे लक्षात घ्या. आज स्वावलंबनानेच कामे होतील. तुमच्या कार्यनिष्ठेने आज  वरीष्ठ प्रभावित होणार आहेत.

 • कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ४

कोणतीच गोष्ट सहज साध्य होणार नाही. धंद्यात उद्दीष्ट साध्य करण्यासाठी कमाचे तास वाढवावे लागतील.  प्रचंड कामाने शारीरीक थकवा जाणवेल.

 • मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ३

दिवसाची सुरवात उत्साहपूर्ण राहील. जागेच्या खरेदी विक्रितून अनपेक्षित लाभ होतील. कुटुंबियांच्या वाढत्या गरजा सहज पूर्ण करता येतील. बच्चेकंपनी खुष राहील. 

बातम्या आणखी आहेत...