Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

रिलिजन डेस्क | Update - May 11, 2019, 12:15 AM IST

शनिवारचे राशिफळ : अशुभ योगामध्ये होत आहे आठवड्यातील शेवटच्या दिवसाची सुरुवात, 6 राशीच्या लोकांनी राहावे सावध, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

 • saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

  शनिवार 11 मे रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होईल. ग्रह-तिथीनुसारआज गंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 6 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. दुपारी दोननंतर वृद्धी नावाचा शुभ योग जुळवून येत आहे. याच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहील.

  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

 • saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

  मीन : सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशआरामी वृत्ती बळावेल. गृहीणी आज ब्युटी पार्लरसाठी आवर्जुन वेळ काढतील. छान दिवस.  शुभ रंग : आकशी | अंक : ५ 

 • saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. कोणतेही कौटुंबिक निर्णय वडीलधाऱ्यांच्या संगनमताने घ्यावे लागतील. शुभ रंग : डाळिंबी | अंक : ६ 

 • saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : वादविवादात आज  स्वत:चेच खरे कराल. आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. तब्येत सांभाळा. शुभ रंग : पांढरा | अंक : ९

 • saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर मात्र महागात पडेल. सामंजस्याचे धोरण हिताचे राहील. शुभ रंग : केशरी | अंक : २

 • saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

  मेष : आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस. कामावर दांडी मारून घरी आराम करायचा मूड राहील. आज काही घरगुती प्रश्नांत लक्ष घलाल मुलांना वेळ द्याल. शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३ 

 • saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : आज तुमच्यासाठी लाभाचा व ईच्छापूर्तीचा दिवस.ध्येयपूर्तीसाठी पूर्वी केलेले कष्ट कारणी लागतील. विरोधकही तुमचे कतृत्व मान्य करतील. छान दिवस. शुभ रंग : मोतिया | अंक : ५

 • saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

  कर्क : आज तुम्ही एखादी क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल. नोकरीच्या ठीकाणी कामाचे दडपण येईल. आज अनावश्यक जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकणे गरजेचे.  शुभ रंग : मरून | अंक : ४

 • saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ : आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेरच जाणार आहे. इतरांना मदत करण्यास तत्पर असाल. जुन्या मित्रांच्या भेटीत गतस्मृतींना उजाळा द्याल. नवे परिचय होतील.  शुभ रंग: जांभळा | अंक : १  

 • saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

  धनू : कंटाळवाणा दिवस. दैनंदीन कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच.  शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७

 • saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले उचला. कोणतेही निर्णय उताविळपणे घेऊ नका. आज तुम्हाला काही पूर्वीच्या चूका निस्तराव्या लागतील. संयम ठेवा. शुभ रंग : क्रिम | अंक : १ 

 • saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : आज पैशाची आवक मनाजोगती राहील. नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. सज्जनांच्या सहवासात विचार प्रगल्भ होतील. आज प्रवासात खाेळंबा होईल. शुभ रंग : हिरवा | अंक : २

 • saturday 11 may 2019 daily horoscope in Marathi

  मकर : व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठीच होईल. काही दूरावलेली नाती जवळ येतील. वैवाहीक जिवनांत आज दाेघांत तिसऱ्याला प्रवेश देऊच नका.  शुभ रंग : आकाशी | अंक : ८

Trending