Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

रिलिजन डेस्क | Update - Apr 13, 2019, 12:00 AM IST

शनिवारचे राशीफळ : आज श्रीरामनवमी आणि सुकर्म नावाचा शुभ संयोग, 8 राशीच्या लोकांना होऊ शकतो धनलाभ, नोकरी आणि बिझनेसमध्ये न

 • saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

  शनिवार 13 एप्रिलचा दिवस बहुतांश राशींच्या लोकांसाठी खास राहील. कारण आज श्रीरामनवमी आहे आहे तसेच पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे सुकर्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेसमध्ये नवीन कामाची प्लॅनिंग होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नये.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

 • saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

  मेष : आज दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. आज प्रेमप्रकरणांत मात्र नसती आफत होईल, सांभाळा. शुभरंग: गुलाबी|अंक:५

 • saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

  वृषभ: आजचा दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील. शुभरंग:अबोली|अंक:६ 

 • saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

  मिथुन : पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील. शुभ रंग : हिरवा| अंक : ९

 • saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

  कर्क : स्वभावातील अहंकारामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक क्लीष्ट कामेही सोपी होतील.  शुभ रंग : निळा| अंक : २

 • saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

  सिंह : कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होण्याची शक्यता आहे. काही बिले भरावी लागतील. शुभ रंग : क्रिम | अंक : ९ 

 • saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

  कन्या : सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा.जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार आहे.कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील. शत्रू पळ काढतील. शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १

 • saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

  तूळ : नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शुभ रंग : मोतिया | अंक : ६

 • saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिक : घरात वडीलधारी मंडळी त्यांची मते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. कामधंद्यातील अडचणी  मानसिक  स्वास्थ्य बिघडवतील. एकांत हवासा वाटेल. शुभ रंग : सोनेरी | अंक : ८

 • saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

  धनू : विश्वासातील माणसाकडूनही विश्वासघात होण्याची शक्यता आहे. मोठया उलाढाली टाळलेल्या बऱ्या. स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका.  शुभ रंग : चंदेरी | अंक : ७

 • saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

  मकर : व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही  जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस. शुभ रंग : पांढरा | अंक : ४

 • saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

  कुंभ : कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरूणांनी व्सनसंपासून दूर रहाणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक रहाणे गरजेचे आहे. शुभ रंग : राखाडी  | अंक : ५

 • saturday 13 april 2019 daily horoscope in marathi

  मीन : कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहीणी आवडत्या छंदास वेळ देतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल. विद्यार्थ्यांना सुयश.  शुभ रंग : क्रिम  | अंक : ३

Trending