आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

शनिवार 14 डिसेंबर 2019 ची सुरुवात दोन शुभ योगांनी होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे शुक्ल आणि ब्रह्मा नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. शुक्ल योग सकाळी 9 वाजून 51 मिनिटांपर्यंत राहील आणि त्यानंतर दिवसभर ब्रह्मा नावाचा योग राहील. या दोन शुभ योगाच्या प्रभावाने 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. घर-कुटुंबात सुख-शांती राहील तसेच आनंदाची बातमी कळेल. नोकरी आणि बिझनेसमध्ये उत्पन्न वाढेल. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

 • मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ५

आज तुम्ही फक्त नाकासमोर चालणे गरजेचे. अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होऊ शकेल. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजारीच मदतीस येतील. 

 • वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ८

राशीच्या धनस्थानातून चंद्रभ्रमण सुरू असल्याने पैशाची कमतरता भासणार नाही. तुमचा कार्यउत्साह वाढेल. खिशात पैसा खेळता असेल. तुम्ही म्हणाल ती पूर्व.

 • मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

तुमचे मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील. ज्येष्ठ मंडळींची प्रकृती ठणठणीत राहील. महत्वाचे निर्णय मात्र विचारांती घ्या. आज हट्टीपणास आवर घाला.

 • कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : १

घरातील वडीलधाऱ्यांच्या विचाराने वागलेले हिताचे ठरेल. ज्येष्ठांनी गाठीशी असलेली पुंजी जपुन वापरावी. केवळ मोठेपणासाठी खर्च करणे टाळा. वाद नकोत. 

 • सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४

नोकरी व्यवसायात उत्साहाचे वातावरण राहील. काही नवे हितसंंबंध जुळून येतील. विवाहेच्छूकांना आशेचा किरण दिसेल. आप्तस्वकीय तुमच्या प्रभावात असतील.

 • कन्या : शुभ रंग : मरून | अंक : २

नोकरीच्या ठीकाणी अधिकार योग चालून येतील. उच्चशिक्षित मंडळींना मनाजोगत्या नोकऱ्या चालून येतील. व्यावसायिकांची बाजारातील पत वाढेल. 

 • तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ५

नोकारी व्यवसायात थोडयाफार अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांनी दिलेली अश्वासने फार मनावर घेऊ नका. आज उपासनेची प्रचिती येईल.

 • वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : २

कार्यक्षेत्रात काही गुप्त शत्रू सक्रिय असू शकतात.आपल्या भावी योजना इतक्यात उघड करू नका.आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करुच नका.

 • धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ८

आर्थिक उन्नत्तीच्या काही नव्या संधी दार ठोठावतील.महत्वपूर्ण निर्णय घेताना द्विधा मन:स्थितीस लगाम घालणे गरजेचे राहील. पत्नीचा सल्ला अवश्य घ्या.

 • मकर : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७

काही मान अपमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक संतूलन ढळू न देणे गरजेचे राहील.आज काही येणी असतील तर मात्र वसूल होऊ शकतील. 

 • कुंभ : शुभ रंग : हिरवा | अंक : ९

दैनंदीन कामे फारच कंटाळवाणी वाटतील. एखाद्या करमणूकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. मुलांसाठी वस्त्रखरेदी कराल. आज तुमचा गृहसौख्याचा दिवस.

 • मीन : शुभ रंग : क्रिम | अंक : ६

शिक्षण क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...