आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 14 मार्च रोजी विशाखा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

  • मेष: शुभ रंग : मरून | अंक : २

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ताकही फूंकून प्या. आज अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल.

  • वृषभ: शुभ रंग : सोनेरी | अंक : ६

व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.

  • मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ५

कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. नोकरीत हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. काही जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. 

  • कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८

उंची राहणीमानाकडे तुमचा कल असेल. विलासी वृत्ती बळावेल. कलाक्रिडा क्षेत्रातील मंडळींच्या महत्वाकांक्षा वाढतील. प्रेमवीरांसाठी ग्रीन सिग्नल. 

  • सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

कौटुंबिक जिवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची कमतरता भासणार नाही. आईचे मन दुखाऊ नका.

  • कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत.                                                                         

  • तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ७

काही दूरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस. 

  • वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : १.

तरुणांनी मौजमजा करताना नितिमत्तेचे भान ठेवावे. उध्दटपणास लगाम गरजेचा आहे. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

  • धनू : शुभ रंग : राखाडी | अंक : ७.

आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. आपल्या अधिकारांचा दूरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी. 

  • मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : ३

अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांत सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.  

  • कुंभ: शुभ रंग : हिरवा | अंक : २

नोकरीच्या ठीकाणी स्वत:चे महत्व सिध्द करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत.कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

  • मीन : शुभ रंग : भगवा | अंक : ४

महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या.

बातम्या आणखी आहेत...