आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saturday 15 February 2020 Daily Horoscope In Marathi

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

7 महिन्यांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

शनिवार 15 फेब्रुवारी 2020 रोजी विशाखा नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज श्री गजानन महाराज प्रकट दिन आहे. या दोन शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी होईल. विशाखा नक्षत्रामध्ये दिवसाची सुरुवात होत असल्यामुळे सर्व सरकारी कामे पूर्ण होतील. टेंडर, टॅक्स, सबसिडी इ. रूपात धनलाभ होईल. नोकरदार लोकांना पेन्शन, पीएफ, व्हीआरएसही मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

  • मेष : शुभ रंग : पांढरा | अंक : ५

आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

  • वृषभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ९

आज तुम्ही अत्यंत आनंदी, उत्साही व ताजेतवाने असाल. एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल.

  • मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. वरीष्ठ गोड बोलून तुमच्याकडून कामे करून घेतील. आज प्रक़ृतीकडे दुर्लक्ष नको. पत्नीची आज्ञा पाळणे हिताचे.  

  • कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ८

कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरणार आहेत. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

  • सिंह : शुभ रंग : मोतिया | अंक : ७

अार्थिक बाजू उत्तम असेल. आज घरसजावटीच्या काही  शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल.  मुलांना दिलेले शब्द पाळू शकाल.वाहनाचीही काळजी  घ्यावी लागेल. 

  • कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ९

काही कौटुंबिक प्रश्न  तुम्हाला चिंताग्रस्त करतील. परंतु जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने त्यावर सहज मात करता येईल. काही कारणास्तव प्रवास घडतील. 

  • तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ५

पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. आत्मविश्वासाने नव्या योजना राबवता येतील. स्पर्धकांना तुमचा हेवा वाटेल. गरजूंना मदत कराल.  

  • वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ६

आज काही मोठे खर्च दार ठोठावणार आहेत. अध्यात्मिक मार्गाकडे आज तुमचा कल राहील.विदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होणार आहेत. 

  • धनू : शुभ रंग : चंदेरी | अंक : ४

बरेच दिवसांपासूनची तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराच्या चाव्या मिळण्याचे योग अहेत. 

  • मकर : शुभ रंग : भगवा | अंक : २

हट्टीपणास लगाम घालणे गरजेचे. इतरांचे विचार ऐकून घ्या. आज महत्वाचे निर्णय घाईगर्दीत घेऊ नका. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकणे गरजेचे आहे. 

  • कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३

आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात.अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.आज मित्रमंडळीं बरोबर मात्र काहीतरी बिनसणार आहे.

  • मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : १

घरात काहीतरी कारणाने वडीलधाऱ्यांंशी मतभेद होऊ शकतात. आपले म्हणणे त्यांना पटवून सांगायचा व्यर्थ खटाटोप न करता, त्यांच्या वयाचा मान राखा.