Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

रिलिजन डेस्क | Update - Mar 16, 2019, 12:00 AM IST

शनिवारचे राशिफळ : सौभाग्य आणि शोभन नावाच्या 2 शुभ योगामध्ये दिवसाची सुरुवात, या 8 राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास राहील शन

 • Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

  शनिवार 16 मार्च 2019 ला पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे सौभाग्य आणि शोभन नावाचे 2 शुभ योग जुळून येत आहेत. याच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आणि रिस्क घेऊन कोणतेही काम करू नये...

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार....

 • Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

  मेष : जवळपासच्या प्रवासात काही नवे हितसंबंध जुळतील.शेजारी आपलेपणाने डोकावतील. मुलांंचे अती लाड थांबवणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम पाळलेले बरे. शुभ रंग : तांबडा| अंक : ३

 • Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ : कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही पुरेसा राहील. मोठे शौक जोपासता येतील. तरूणांना व्यसने आकर्षित करतील. आज मनावर संयम गरजेचा. कायद्याचे पालन करावे.  शुभ रंग : पिस्ता| अंक : ७

 • Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : इतरांना न जमणारे काम करून दाखवण्याचा तुमचा हट्ट असेल. उच्च राहणीमानाकडे कल राहील. झटपट लाभाचा मोहाने नुकसान होईल. सतर्क रहा. शुभ रंग : नारिंगी | अंक : ३

 • Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

  कर्क : आज बराच वेळ घराबोर जाईल. एखाद्या महत्वाच्या कामासाठी बरीच वणवण करावी लागेल. काही जणांचा गूढशास्त्रांच्या अभ्यासाकडे ओढा राहील. व्यस्त दिवस. शुभ रंग : आकाशी | अंक : ८ 

 • Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : आज राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित धनवृध्दी करेल. कार्यक्षेत्रातील अनुकूल घटनांनी उत्साह वाढेल. विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.  शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९

 • Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : आज रिकाम्या गप्पा परवडणार नाहीत. नोकरदारांना जास्त वेळ थांबून कामे पूर्ण करावी लागतील. काही  कारणाने कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. शुभ रंग : हिरवा | अंक : ६

 • Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : नोकरी व्यवसायात आज काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. अधिकारी वर्गाचे मूड सांभाळावे लागतील. ज्येष्ठ मंडळींना उपासनेची ओढ लागेल. शुभ रंग : पांढरा| अंक : ७

 • Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : आज दैनंदीन कामात अडथळे येतील. कार्यक्षेत्रात विरोधक मानसिक संतुलन बिघडवू शकतात. एखाद्या प्रसंगी अहंकार दुखावला जाऊ शकतो.  शुभ रंग : लाल| अंक : ४

 • Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

  धनू : आज वैवाहीक जिवनांत सामंजस्य राहील. घरात एखाद्या मंगल कार्याविषयी बोलणी होतील. आज तुम्हाला जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल.  शुभ रंग : निळा | अंक : ५   

 • Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

  मकर: आज तुम्हाला काही नकळत झालेल्या चुका निस्तराव्या लागतील. कुणाला शब्द देऊ नका कारण ते पाळता येणार नाहीत. अाज तुम्हाला जरा विश्रांतीची गरज भासेल. शुभ रंग : राखाडी | अंक : ३

 • Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : आज प्रकृती ठणठणीत असल्याने तम्हाला प्रत्येक कामात उत्साह जाणवेल. मुलांचे महागडे हट्ट पुरवताना मात्र नाकी नऊ येतील. मनोेरंजनासाठी वेळ काढाल. शुभ रंग : निळा | अंक : २

 • Saturday 16 March 2019 daily horoscope in Marathi

  मीन : कार्यक्षेत्रातील वाढत्या कामाचा शीण जाणवेल.नोकरदारांचा ऑफिसला दांडी मारायचा मूड असण्याची शक्यता आहे. आज काही सज्जनांचा सहवास लाभेल. शुभ रंग : जांभळा | अंक : १

Trending