आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 19 ऑक्टोबर 2019 रोजी मृगशीर्ष नक्षत्र असल्यामुळे परीघ नावाचा अशुभ योग तयार होत आहे. या योगामध्ये कोणतेही शुभ काम वर्ज्य आहे. आजचा दिवस 12 पैकी पाच राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. या पाच राशीच्या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त नोकरी आणि बिझनेसमध्ये कामे अडकू शकतात. इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग : मरून | अंक : २ 
आज शेजाऱ्यांशी मिळून मिसळून रहावे. नोकरीतही सहकारी वर्गाशी जळवून घ्यावे लागणारआहे. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे. 

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ७
पैशाच्या बाबतीत काहीच कमी पडणार नाही. आज सुसंवादाने अनेक कामे सोपी होतील. भावंडात मात्र क्षुल्लक गोष्टींवरुन मतभेद हाेण्याची शक्यता आहे. 
 

मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : १                                                                          
अथक प्रयत्नांच्या जोरावर यशाकडे तुमची वाटचाल चालूच राहील. आज तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल. एखाद्या कामासाठी भटकंती होईल.


कर्क :  शुभ रंग : पिस्ता | अंक
: ८
थोडीफार आर्थिक ओढाताण होईल. अनावश्यक खर्च कमी करुनच जमाखर्चाचा तराजू समतोल ठेवता येईल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. 

सिंह : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
आज काही दूरावलेले नातेसंबंध परत जवळ येतील. पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टीक्षेपात येईल. विवाहेच्छूकांना अपेक्षित स्थळांचे प्रस्ताव येतील. 

कन्या : शुभ रंग : क्रिम| अंक : १
काही व्यावसायिक उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी असायला हवी. आज कतृत्ववान व्यक्तींचा सहवास लाभेल. अत्यंत व्यस्त दिवस.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७
अत्यंत व्यस्त दिवस असून नोकरीत कामाचे दडपण जाणवणार आहे. काही वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. तुमच्या  अधिकारात वृध्दी होणार आहे. 

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ५
तरुणांनी आज हौसमौज करतानाही मर्यादेत रहावे.नितीबाह्य वर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येण्याची शक्यता आहे. वैवाहीक जिवनांत थोडी आदळआपट संभवते. 


धनू :  शुभ रंग : आकाशी| अंक
: ९
कार्यक्षेत्रात एखाद्या मनासारख्या घटनेने तुमचा उत्साह वाढेल. महत्वाच्या वाटाघाटी करण्यासाठी आज दिवस अनुकूल आहे. विवाह जुळवण्यात मध्यस्ती कराल. 

मकर : शुभ रंग : निळा| अंक : ६
कामगारांच्या रास्त मागण्या वरीष्ठांकडून मान्य होतील.बेरोजगारांना रोजगार मिळेल. काही जुने आजार दार ठोठवाणार आहेत. आरोग्याच्या बाबतीत जागरुक रहा.

कुंभ : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ४
आज तुमचा उंची रहीणीमानाकडे कल असेल.चैनी व विलासी वृत्ती जोपासाल. प्रिय व्यक्तीच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल. प्रेमप्रकरणे छान फुलतील.

मीन : शुभ रंग : भगवा | अंक : ५                                                                       
अनपेक्षितपणे हाती पैसा येईल व तो जाण्याचे मार्गही प्रशस्त असतील. बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.प्रेमप्रकरणे डोक्याला ताप होतील. गृहीणींना उसंत नाही. 

बातम्या आणखी आहेत...