Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

रिलिजन डेस्क | Update - Apr 20, 2019, 12:00 AM IST

शनिवारचे राशिफळ : मेषपासून मीनपर्यंत सर्व 12 राशींसाठी कसा राहील शनिवार, कोणत्या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

  • aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi
    आज शनिवार 20 एप्रिल रोजी चंद्र तूळ राशीमध्ये राहील. शनिवारी स्वाती नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगामध्ये सुरु करण्यात आलेल्या कामामध्ये यश प्राप्त होण्याची शक्यता जास्त राहते. शनिवारी शनिदेव आणि हनुमानाची विशेष पूजा करावी. येथे जाणून घ्या, सर्व 12 राशीच्या लोकांसाठी कसा राहील शनिवार....

  • aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi

    मेष : वैवाहिक जीवनात आनंद द्विगुणित करणारी घटना घडेल. नवे स्नेहसंबंध जुळतील. नाती जपण्यासाठी खरे बोलण्यापेक्षा गोड बोलणे हिताचे राहील. शुभ रंग : तांबडा|अंक : १ 

  • aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi

    वृषभ : काही क्षुल्लक कारणाने वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागण्याची शक्यता आहे. आज गरजेपुरतेच बोलणे हिताचे. जिभेवर ताबा असू द्या. शुभ रंग : क्रीम|अंक : ३ 

  • aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi

    मिथुन : व्यवसायात काही नव्या संधी चालून येतील. एखादा नव्या विषयात गोडी निर्माण होईल. गृहिणी सौंदर्याची तसेच फिटनेसची काळजी घेतील. उत्साही दिवस. शुभ रंग : मरून|अंक : ३ 

  • aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi

    कर्क : परिवारात काही आनंदी घटनांनी खेळीमेळीचे वातावरण राहील. अनेक दृष्टींनी अनुकूल असा दिवस सत्कारणी लावणे तुमच्या हाती आहे. खेळाडूंनी सराव वाढवावा. शुभ रंग : जांभळा|अंक : ९ 

  • aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi

    सिंह : लेखन, पुस्तक प्रकाशन तसेच जाहिरातीच्या क्षेत्रात अनुकूलता राहील. साहित्यिक, कवी यांना वाचकवर्ग मिळेल. कोणतेही गैरव्यवहार मात्र टाळायला हवेत. शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ 

  • aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi

    कन्या : आनंदी व उत्साही दिवस. खिशात पैसा खेळता राहील.काही नवे हितसंबंध जुळतील. आज वाणीवर मात्र लगाम असणे अत्यंत गरजेचे राहील. शेजारी वाद शक्य. शुभ रंग : भगवा | अंक : २ 

  • aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi

    तूळ : स्वभावातील लहरीपणास आवर घालून संयमाने वागणे गरजेचे आहे. स्पर्धकांवर मात करण्यासाठी अविश्रांत परिश्रम अवश्यक आहेत. जोडीदार समजुतीने घेईल. शुभ रंग : पिस्ता | अंक : ५ 

  • aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi

    वृश्चिक : सार्वजनिक कामे करणाऱ्यांना लोकप्रियता मिळेल. योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे यशाकडे तुमची वाटचाल चालू राहील. कलाकारांना प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : राखाडी | अंक : ४ 

  • aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi

    धनू : आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. मनाजोगत्या घटना घडल्याने मानसिक प्रसन्नता राहील. मित्रमंडळींचे सहकार्य मोलाचे राहील. प्रलोभने आकर्षित करतील.  शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २ 

  • aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi

    मकर : कार्यक्षेत्रात वरिष्ठांवर तसेच सहकारी वर्गावर तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. आज भावनांच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. मित्रांना दूर ठेवा. शुभ रंग : निळा | अंक : ६ 

  • aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi

    कुंभ : बेकायदेशीर कृत्यातून त्रास संभवतो. नाकासमोर चालणेच हिताचे राहील. वडीलधाऱ्यांच्या आज्ञेत राहा. नोकरीधंद्याच्या दृष्टीने दिवस अनुकूल नाही. शुभ रंग : केशरी | अंक : ७ 

  • aajache rashibhavishya saturday 20 april 2019 daily horoscope in Marathi

    मीन : जे चाललंय ते बरं चाललंय. प्रतिष्ठेस जपणे गरजेचे आहे. वाहन सुरक्षित चालवा. विवाह जुळवण्या विषयी बोलणी उद्यावर ढकला. शुभ रंग : पांढरा | अंक : ८ 

Trending