आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

शनिवार 23 नोव्हेंबरची ग्रह-स्थिती दोन शुभ योग तयार करत आहे. हस्त नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आज प्रीती आणि आयुष्मान नावाच्या शुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर पाच राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

 • मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ३

काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. पथ्यपाणी नाही पाळलेत तर आजार बळावण्याची शक्यता अाहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.        

 • वृषभ: शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी नको. महत्वाच्या कामास विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच रहाणार आहे. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसेल.

 • मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १

वास्तू, वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील.कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टीक्षेपात येईल. कला, क्रिडा क्षेत्रातील मंडळींनी प्रयत्न वाढववेत.

 • कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : २

परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज जमिन जुमल्याच्या व्यवहारात सावध रहाणे गरजेचे आहे.           

 • सिंह : शुभ रंग : लाल | अंक : ६

अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. त्याचप्रमाणे खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. गृहीणींना विविध जाहीराती भुरळ घालतील. आज पायपीट होईल.   

 • कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : २

आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. अती आत्मविश्वासाने नुकसान होईल. आज तब्येत जरा नरमच राहील.

 • तूळ : शुभ रंग : लेमन | अंक : ४

रिकामटेकडया चर्चेत व वादविवादात वेळ फुकट जाईल. महत्वाची कामे दुर्लक्षित होतील. आज एखाद्या मॉलमधे फेरफटका माराल. बिनधास्त खर्च कराल.  

 • वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १

चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. उच्चशिक्षितांना  मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. छान दिवस.                                          

 • धनू : शुभ रंग : केशरी | अंक : ३

अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरुच राहील. नोकरदारांना वरीष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. व्यस्त दिवस. 

 • मकर : शुभ रंग : निळा | अंक : ५

नोकरदारांवर कामाचा प्रचंड ताण राहील. कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना घडल्याने नैराश्य येईल. आज वरीष्ठांशी नमते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.

 • कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ७

हौसमौज जरूर करा पण आपल्या मर्यादा सांभाळा.कुसंगतीपासून लांबच रहा. नितीबाह्य वर्तन आंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे राहील.

 • मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : ९

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग सहजच सोडवू शकाल. वैवाहीक जिवनांत लाडीक रुसवे फुगवे असतील. 

बातम्या आणखी आहेत...