Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

रिलिजन डेस्क | Update - May 25, 2019, 12:05 AM IST

शनिवार राशिफळ : 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस राहील चांगला. करिअरमध्ये पुढे जाण्याची मिळेल संधी, जॉब आणि बिझनेसमध्ये होऊ शकतो फायदा...

 • Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

  शनिवार, 25 मे 2019 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. शनिवारी श्रवण नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

 • Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

  सिंह : शुभ रंग : मोतिया | अंक : ४
  उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काबाड कष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपेल. मित्रांमधे आज काही वैचारीक मतभेद होण्याची शक्यता आहे.

 • Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

  वृषभ : शुभ रंग : केशरी | अंक : २
  कर्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरीष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.विरोधकांशी गाेड बोलूनच वेळ मारून न्यावी लागेल. 

 • Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

  मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५ 
  उद्योग व्यवसायात प्रगतीरथ वेेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील.

 • Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

  मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७
  एखाद्या नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू अाहे. अपूरी स्वप्ने साकार होतील.  

 • Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ३
  अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. आज महत्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. 

 • Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

  तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २
  मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या कौटुंबिक सोहळयात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना आधी स्वत:ची शिल्लक तपासणे गरजेचे. 

 • Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

  कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : १
  आज काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी विचार करा. गृहीणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवलेली बरी. 

 • Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

  मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९
  आज काही क्षुल्लक कारणाने घरातील थोरांशी मतभेद संभवतात. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत व्यवहार नकोत. 

 • Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

  मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : २
  आज तुम्हाला संयमाची गरज असून अती उत्साहाच्या  घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. मुलांनी आज्ञेत रहावे.   

 • Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

  धनू :  शुभ रंग : जांभळा | अंक : १
  अधुनिक रहाणिमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहीणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. छान दिवस.   

 • Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

  कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ३
  उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल.  नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.   

 • Saturday 25 may 2019 daily horoscope in marathi

  कर्क :  शुभ रंग : जांभळा | अंक : ६
  आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्ती कराल. पत्नीस दिलेली वचने पाळाल. 

Trending